कोथरुड ‘मिसिंग लिंक’ मार्गी ८ मीटरच्या रस्त्याचे १२ मीटर रुंदीकरण; ना. चंद्रकांतदादांचा यशस्वी पाठपुरावा

0

पुणे शहरातून कोथरूड वारजे माळवाडी शिवणे कोंढवे धावडे बावधन आणि मुळशी तालुका संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये दुचाकी द्वारे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रजपूत वितभट्टी हा ‘मिसिंग लिंक’ नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन चार चाकी वाहतूक असलेल्या या अरुंद रस्त्यावर प्रशासनाच्या वतीने फक्त दुचाकीसाठी वाहतूक निर्णय घेऊन या प्रश्नाकडे बगल देण्याचे काम केले होते. सर्वसामान्य नागरिकांना हा बदल इतका अंगवळणी पडला होता की केवळ दुचाकी वापर अशी मानसिकता करून या भागातील नागरिक नित्य कर्म करत असतानाच कोथरूड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. मतदारसंघतील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत सातत्याने बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे गतीमान झालेल्या महापालिकेने मिसिंग लिंकमधील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भागातील ८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण होऊन रस्याचे रुंदीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ८ मीटरच्या रस्ता १२ मीटर झाला असून, सदर रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला आहे. त्यामुळे कोथरुडकरांची मोठी सोय झाली आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.