‘राष्ट्रवादी’चा स्ट्राईक रेट जास्त बक्षीस म्हणून फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीला हे ‘मानाचंपान’ हे गिफ्ट मिळणार

0

मुबई : लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये महायुती बॅकफूटवर पडली. पण महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केलं. महाविकास आघाडीची मोठी गच्छंती झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक दिग्गजांना पराभव पचवावा लागला. विक्रमी बहुमत घेत महायुती सरकारने राज्यात सत्ता स्थापन केली. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजप सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असणार आहे. विधानसभेत भाजपचे मोठे संख्याबळ असल्याने भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष पद देखील रिक्त असल्याने या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

हे पद शिवसेनेला की राष्ट्रवादीला मिळणार? यावरुन चर्चा रंगल्या आहेत. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. या पदावर राष्ट्रवादीच्या नेत्याची वर्णी लागण्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या म्हणण्याप्रमाणे, निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे. याचंच बक्षीस म्हणून की काय भाजप आता राष्ट्रवादीला विधानसभा उपाध्यक्ष पद देणार आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या कार्यकाळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर आताचे राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता पक्षाला भाजपकडून उपाध्यक्षपदाचा मान पुन्हा राष्ट्रवादीलाच देणार असल्याचे समजते. विधीमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष पदावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द; नियमित कायदेशीर व्यवहार म्हणजे ‘किकबॅक’ नव्हे

अजित पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. धनंजय मुंडे बैठकीला हजेरी लावतील. या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे समजते.