जळगावात गाडीत CNG भरत असताना स्फोट, बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली

0

CNG स्वस्त आहे म्हणून अनेक जण आपल्या पेट्रोल गाड्यांना बेकायदेशीरपणे सीएमजीचं कीट बसवतात. पण त्यामुळे मोठा धोका उद्भवू शकतं. अनेकजण अवैधरित्या वाहनामध्ये गॅसची भरतीदेखील करतात. पण शक्यतो तशा चुका टाळायला हव्यात. कारण त्यामुळे मोठ्या अपघाताच्या घटनेला सामोरं जाण्याची नामुष्की ओढावली जाऊ शकते. जळगावात अशीच काहीशी घटना घडली आहे. बेकायदेशीररित्या वाहनात गॅस भरती केल्याने जळगावात ओमनी गाडीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात संबंधित दुकान जळून खाक झालं आहे. तसेच बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली. या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

नेमकं काय घडलं?
जळगावात गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि एक गाडी मालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातून ही गंभीर घटना घडली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला. त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत भाजलेल्या गंभीर चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात
घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन दलामे घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण ओमनी दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. या स्फोटामध्ये एक बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉल सारखी उडाल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित परिसरात एमआयडीसी पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेनंतर नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.