विधानपरिषदेच्या चार जागा आज निवडणुकीचा निकाल; मविआची मुसंडी कायम की महायुती जल्लोष करणार?

0

लोकसभा निवडणुकी निकालानंतर काही दिवसांतच झालेल्या महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज (सोमवार 1 जुलै) लागणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारही पूर्ण झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत देशात जरी भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीला पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने मुंसडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील आगामी निवडणुकी या चुरशीच्या होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

याच पार्श्वभूमीवर 26 जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली. या चारही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली होती. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती या निवडणुकीच्या निकालाची, अखेर उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

या निवडणुकीचे मतदान 26 जून रोजी पार पडल्यानंतर अनिल परब, किरण शेलार, निरंजन डावखरे यांसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले होते, त्याचा फैसला आता होणार आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक व दोन पदवीधर अशा एकूण 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते. देण्यात तर, कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता.

तर महायुतीत भाजपकडून मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर या जागांवर उमेदवार देण्यात आले होते. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आला होता. तर, नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार होता.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाच उमेदवार होते, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ज. मो. अभ्यंकर विरुद्ध भाजपच्या शिवनाथ दराडे. तसेच शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांच्यात थेट लढत झाली.

दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत झाली आणि कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश कीर यांची लढत होती. याशिवाय नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटाचे) किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे मैदानात होते.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

कोकण पदवीधर मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 63.00 टक्के तर मुंबई पदवीधर मतदारसंघात 56.00 टक्के मतदान झाले होते. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी 75.00 टक्के तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी 93.48 टक्के इतकी होती, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आली होती.