भाजपचा मोठा डाव मते विभाजनास ‘मनसे’चा उमेदवार?; ठाकरेंच्या शिलेदाराला रोखण्याची शिंदे अन् ठाकरेंचा खांदा

0

गेली 10 वर्षे दक्षिण मुंबई मतदार संघ शिवसेनेकडे असल्यानं शिवसेना (शिंदे गट) या मतदार संघासाठी आग्रही आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. हा मतदार संघ शिवसेनेला (शिंदे गट) देण्याबाबत महायुतीत विचार सुरू आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गट) आलेले खासदार मिलिंद देवरा यांना या मतदार संघातून लढविण्याबाबत विचारणा करण्यात येत आहे. तर भाजपकडूनही दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे.

गेली 10 वर्षे दक्षिण मुंबई मतदार संघ शिवसेनेकडे असल्यानं शिवसेना (शिंदे गट) या मतदार संघासाठी आग्रही आहे. तर, या मतदार संघातून भाजपलाही आपला उमेदवार लोकसभेत पाठवायचा आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून, भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी ही जागा कोणाला द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांतील भाजपच्या नेत्यांशी वाढलेली सलगी पाहता ही जागा मनसेशी युती करून त्यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकर यांनी या मतदार संघात प्रत्यक्ष प्रचार सुरू केला नसला तरी मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. मात्र, नार्वेकर यांच्या विजयाची अद्यापही भाजप नेत्यांना खात्री नाही. मंगल प्रभात लोढा यांचा या जागेवर दावा असला, तरी लोढा यांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे नावही सध्या चर्चेत नाही.

त्यामुळे शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाचा विचार सुरू आहे. देवरा मैदानात उतरल्यास काँग्रेसचे मतदार काही प्रमाणात त्यांना पसंती दर्शवू शकतात. भाजपचे गुजराती आणि जैन मतदारही देवरांना पसंती देऊ शकतात. राहिला प्रश्न मराठी मतांचा. तर, मराठी मतांत विभाजन झाल्यास अरविंद सावंत यांचं मताधिक्य कमी होऊ शकते. त्याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा देवरा यांना होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

दरम्यान, मराठी मतांत विभाजन करण्यास आणखी एखादा तगडा मराठी उमेदवार द्यावा लागेल. त्यासाठी मनसेचा उमेदवार रिंगणात उतरविल्यास देवरा यांना फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीनं महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मनसेची मैत्रीपूर्ण मदत लोकसभा निवडणुकीत घेऊन त्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत मनसेला त्यांच्या जागा जिंकून देण्याबाबत महायुती मदत करू शकते. अथवा सत्तेत काही प्रमाणात वाटा देण्याचेही आश्वासन दिले जाऊ शकते.

मनसे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात घोषणा करतात याकडे पाहावे लागणार आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांनी जास्त बोलण्यास नकार दिला. पण, आदेश दिल्यास तयार असल्याचे सूचक विधान नांदगावकरांनी केले.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?