कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने फटाके मुक्त, स्वच्छता व पर्यावरण पूरक दिवाळी जनजागृती अभियान!

0

“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण – २०२६” अन्वये घनकचरा व्यवस्थापन, कमिन्स इंडिया लि. ,रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, स्वच्छ व जनवानी सहकारी संस्था, कोथरूड व्यापारी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक ३१, डहाणूकर कॉलनी सर्कल व कोथरूड गावठाण परिसरामध्ये दिवाळीचा सण हा फटाके मुक्त, स्वच्छता व पर्यावरण पूरक साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती पर उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छते विषयी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे, पाण्याचा अपव्यय टाळून वापर कमी करणे, दिवाळीच्या सणामध्ये फटाके वाजवू नये, कर्णबधिर होणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गोवा, गुटखा खाऊन थुंकू नये, मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून सार्वजनिक रस्ते अस्वच्छ करू नये, हात गाडीवाले, पथारी वाले, भाजी व फळ विक्रेते, स्नॅक सेंटर, चहा, हारफूल, पान विक्रेते तसेच सर्व प्रकारच्या व्यवसायिकांनी आपल्या दुकाना समोर कचरा वर्गीकरणाचे डब्बे ठेवावे अशा सुचनाही देण्यात आल्या.

अधिक वाचा  ११ वर्षांची जनसेवेची परंपरा यंदाही अखंड; किरण दगडेपाटील यांनी ७ हजार कुटुंबांत दिवाळीचा आनंद फुलवला

“प्लास्टिक पिशवीला ना म्हणा, कागदी पिशवीला हा म्हणा, कचरा करुनी कमी, आरोग्याची मिळेल हमी, परिसराची करू सफाई होईल आरोग्याची कमाई, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, प्रदूषण मुक्त दिवाळी निरोगी आपण,निरोगी निसर्ग, निसर्गाची काळजी हेच खरे दिवाळीची गिफ्ट,आवाज नाही प्रदूषण नाही आनंद मात्र दुप्पट, माझ्या आरोग्यासाठी फटाके नाही, फटाके नाही दिवे लावा हसरे चेहरे आणि आनंद वाटा, चला मानवी साखळी बनवूया फटाके मुक्तीचा संदेश घरोघरी पोहोंचवू या, फटाके टाळा, कचरा कमी करा, निसर्ग वाचवा, आरोग्य जपा, प्रदूषण टाळा निसर्ग वाचवा मानवी आरोग्य वाचवा, निसर्गाचा करू नका ऱ्हास अन्यथा होईल मानवी जीवन भकास” अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांना फटाके मुक्त स्वच्छता व पर्यावरण पूरक सण साजरा करण्याचे संदेश देण्यात आले. सदर परिसरामध्ये स्वच्छता करून रांगोळी व मानवी साखळी तसेच प्रचार फेरी च्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात आले. या मोहिमेमध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक करण कुंभार, किरण जाधव, राजेश आहेर, दत्तात्रय दळवी, गणेश साठे, गणेश चौधरी, श्रीमती जया सांगडे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, कमिन्सचे संपत खैरे, रोटरीचे किरण इंगळे, जनवानीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील, स्वच्छ संस्थेचे शिवाजी सकट,व्यापारी संघाचे शशिकांत उभे, सुभाष निंबाळकर व इतर सर्व नागरिक शिवाय स्वच्छता सेवक सहभागी झाले.

अधिक वाचा  पुण्यातील पहिल्या डिजिटल ‘सेवाधाम’ची अनोखी भेट; भाजपाचा वारज्यातील पहिला प्रकल्प भव्य लोकार्पणास चंद्रकांतदादांची उपस्थिती!