राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्यानं सोडली साथ, पक्षात राज्य सरचिटणीस म्हणून सक्रिय असतानाच धरली थेट काँग्रेसची वाट

0

पुण्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला मोठा धक्का बसला आहे. रणजीत शिरोळे यांनी मनसेची साथ सोडली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हा पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील रणजीत शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा