वारजे बदलतेय! पुण्यातील पहिल्या डिजिटल ‘सेवाधाम’ची अनोखी भेट; २४ तास तक्रार निवारण केंद्रासह विविध नागरी सुविधांचे भव्य लोकार्पण!

सामाजिक बांधिलकीतून साकारलेला अभिनव उपक्रम नगरसेविका हर्षदा भोसले यांच्या संकल्पनेचे आधुनिक नागरी सुविधांचे केंद्र

0

पुणे : नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी, परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वारजे-माळवाडी परिसरात ‘सेवाधाम’ हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. सौ. हर्षदा शंतनु भोसले यांच्या निधीतून तसेच पुणे महानगरपालिका व नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्या विशेष सहकार्याने साकारलेल्या ‘सेवाधाम’ या विविध नागरी सुविधांनीयुक्त सुशोभीकरण प्रकल्पाचा ‘लोकार्पण’ सोहळा आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते श्री. गणेश बिडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

नगरसेविका सौ. हर्षदा शंतनु भोसले यांच्या निधीतून तसेच पुणे महानगरपालिका व नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्या विशेष सहकार्याने उभारण्यात आलेल्या या ‘सेवाधाम’ प्रकल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ३२, वारजे-माळवाडी-शिवणे परिसरातील माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील पुलाखालील जागेचे आकर्षक सुशोभीकरण करून नागरिकांसाठी विविध सुविधांनी युक्त असे केंद्र विकसित करण्यात आले आहे. केवळ परिसराचे सुशोभीकरण न करता या जागेचा उपयोग नागरिकांच्या सेवेसाठी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सात महत्त्वाच्या सुविधा

‘सेवाधाम’ प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

२४ तास नागरिक समस्या निवारण केंद्र : नागरिकांच्या समस्या व तक्रारींची दखल घेऊन त्यांना मदत, मार्गदर्शन आणि योग्य तोडगा मिळवून देण्याची व्यवस्था.

डिजिटल सेवा प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयत्न.

२४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा : गरजू नागरिकांना आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळावी, यासाठी सुविधा.

मोफत ग्रंथालय : ज्ञानार्जन आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांसाठी ग्रंथालय.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

वृत्तपत्र वाचनालय : दैनंदिन घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र वाचन व्यवस्था.

तिरंगा रोषणाई : राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारी आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई.

हरित व वृक्षसंपदा: हिरवाईने नटलेला, प्रसन्न आणि सुंदर परिसर निर्माण करण्यावर भर.

महिला सक्षमीकरण केंद्र: महिलांच्या विकासासाठी, मार्गदर्शनासाठी आणि सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम.

या सुविधांमुळे ‘सेवाधाम’ हे केवळ सुशोभीकरणाचे ठिकाण न राहता नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांसाठी उपयुक्त केंद्र ठरणार आहे.

सामाजिक बांधिलकीतून विकासाचा नवा आदर्श

सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सार्वजनिक जागांचा लोकहितासाठी उपयोग व्हावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी सेवा अधिक सक्षम व्हाव्यात, या संकल्पनेतून ‘सेवाधाम’ची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकीतून उभारलेला हा उपक्रम वारजे-माळवाडी परिसराच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा ठरण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच वाचनसंस्कृती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा यांचा एकत्रित विचार या प्रकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे इतर प्रभागांसाठीही हा उपक्रम एक अनुकरणीय आदर्श ठरू शकतो.

लोकार्पण सोहळ्याचे ठिकाण व वेळ

  • रविवार, १ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
  • स्थळ : माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील अंडरपास, वारजे सर्व्हिस रोड, पुणे – ५८.
  • संकल्पना : सौ. हर्षदा शंतनु भोसले, नगरसेविका, पुणे महानगरपालिका.
  • निमंत्रक : सौ. हर्षदा शंतनु भोसले आणि सौ. रोहिणी वासुदेव भोसले, भाजप उपाध्यक्ष, खडकवासला मतदारसंघ.

एकूणच, वारजेच्या विकासाला केवळ रस्ते आणि इमारतींपुरते मर्यादित न ठेवता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा उपलब्ध करून देण्याचा ‘सेवाधाम’ हा अभिनव प्रयत्न आहे. ‘सेवा, सुविधा आणि समर्पण’ या त्रिसूत्रीवर आधारित हा प्रकल्प वारजेच्या नागरी विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.