कोथरुड पोलीस स्टेशन येथे दिनांक २५/१०/२०२६ रोजी इसम नामे श्रीकांत सिधु यादव वय ३६ वर्ष, व्यवसाय इलेक्ट्रशन, रा. निकम चाळ लेन ७ कर्वेनगर पुणे यांनी त्याचे उजवी भुसारी कॉलनी कोथरुड येथील नवीन बांधकामाचे साईट वरुन विल्डिंग मधील फ्लॅट फोडुन ७,०७,३६०/- (अ.रु. सात लाख सात हजार तीनशे साठ) रुपयाची कॉपर वायर कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेहलेने त्यांनी कोथरुड पोलीस ठाणेत गु.रं.नं. ४२२/२०२६ भा.न्या. सं.३०५ (५), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे दाखल केला होता.
कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घरफोडीच्या गुन्हया मधील आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण पो.हे.कॉ योगेश सुळ, पो.कॉ/ गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदिप जवादे, सुरज कदम, उमेश राऊत असे कोथरुड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हयांचे अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना कोथरुड पोलीस स्टेशनचे चीकी अंमलदार योगेश सुळ यांना त्याच्या गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल घेऊन विक्री करणे करीता दोन संशयीत इसम हे डुक्कर खिंड सर्वीस रोड कोथरुड पुणे येथे येणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहीती पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांना सांगीतली असता त्यांनी सदरची माहीती कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना सांगीतली असता त्यांनी लागलीच सदरच्या माहीतीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेचे आदेशशीत केले.
संशयीताना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अहमद रजा इसरार अहमद खान रा. गाव हरैय्या चंन्द्रासी ता. तुलशीपुर जि. बलरामपुर उत्तर प्रदेश २) कव्याज मेराज शहा रा. गाव सिशानिया घोपलापुर, राम नगर ता. तुलशीपुर जि. बलरामपुर उत्तर प्रदेश असे असलेचे सांगीतले.
पाढ-या रंगाच्या गोणीमध्ये कॉपर वायर मिळुन आल्या त्यांचेकडे पोलीसांनी अधिकची चौकशी केली असता त्यांनी सदर कॉपर वायर ही कोथरुड उजवी भुसारी कॉलनी येथील नविन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणाहुन चोरी केले असलेचे कबुल केले. अधिकची चौकशी करुन त्यांना कोथरुड पोलीस स्टेशन गु.रं.नं. ४२२/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१२(४) या गुन्हयात अटक केली आहे. व त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली ७,०७,३६०/- (अ.रु. सात लाख सात हजार तीनशे साठ) रुपयाची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रदेशीक विभाग पुणे शहर श्री राजेश बनसोडे साो, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ डॉ. श्री सागर कवडे साो. सहा. पोलीस आयुक्त सो कोथरुड विभाग श्रीमती सुजाता तानवडे साो. याचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके सारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने सो पोलीस निरीक्षक सुनिल कारोटे साो. सहा पोलीस निरीक्षक संदीप घले, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण पो.हे.कॉ योगेश सुळ, पो.कॉ/ गौतम पवार, विशाल मंडले. अजय पवार, प्रदिप जवादे, सुरज कदम, उमेश राऊत यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण हे करीत आहेत.



