वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

0

ऑक्टोबर महिन्याच्या अगदी शेवटात राज्यातील हवामानात सतत बदल जाणवताना दिसून येत आहे. काही भागांत पावसाची उघडझाप सुरू आहे, तर काही भागांत हवामान विभागाने वातावरण कोरडं राहील अशी शक्यता वर्तविली. भारतीय हवामान विभागाने 28 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे…

कोकण

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र रत्नागिरीत मेघगर्सनेसह सरी कोसळतील, तर सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस किंवा मेघगर्जनेची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगरात 28 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकच्या घाटमाथा परिसरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. तर सांगलीत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

मराठवाडा

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तिन्ही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तसेच यलो अलर्टची शक्यता वर्तविली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर बीड जिल्ह्यात वातावरण कोरडं राहील असा अंदाज आहे.

विदर्भ

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, याच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजद आहे, या जिल्ह्याला ऑरेंज अलर्टची शक्यता आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही