MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

0

एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू होतं. अखेर या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मंत्री शिवेंद्र राजे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.एमपीएससी आंदोलनाचा चेहरा बनललेल्या विवेकानंद पाटीलने आंदोलन इतके दिवस चाललं यात सरकारकडूनच चर्चेला उशीर झाल्याचं म्हटलं. सरकार पहिल्या दिवशी चर्चेला आलं असतं तर दुसऱ्या दिवशी संपलं असतं. सरकारकडून १० दिवसांनी जाग येते हे आमचं दुर्दैव आहे. मुंगी मेली तरी सरकारला जाग यायला पाहिजे असं म्हटलं.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी तुकाराम मुंढे यांची चौकशी समिती सचिव पदी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केलीय. आंदोलन थांबत नाहीय तर तत्वता थांबवत आहे असं म्हणत विवेकानंद पाटील यांनी आंदोलन थांबवल्याची घोषणा केली.चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. त्या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही शिवेंद्र राजेंनी दिलं. चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं की, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केलीय. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.आंदोलनात भीमनवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते. जर चौकशीत दोषी आढळला तर त्याला जेलमध्ये टाका. अभय वाघला संरक्षण देऊ नये. तोच पेपरफुटीचा सूत्रधार होता. ६० दिवसात चौकशी पूर्ण व्हावी. मी तसंही करिअर दावणीला लावलंय. ६१व्या दिवशी पुन्हा रस्त्यावर येईन असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.