महागणपती ‘दगडूशेठ’चा विस्तार आत्ता शक्य; पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव फरासखाना पोलिस ठाण्याची जागा शक्य

0

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या मंदिर विस्तारासाठी पावलं उचलली जात आहेत, त्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या लगतच असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागे टिकटूनच फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाणी आहेत. ही पोलीस ठाण्यांची जागा दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारासाठी ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना-हरकत’ दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे नुकताच सादर केला आहे.

पोलिस ठाण्याची जागा तत्काळ हस्तांतरित होणार नसून त्याआधी फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्यासह इतर कार्यालयांसाठी नवीन अत्याधुनिक इमारत उभारणे आणि सध्या कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या पोलिस कार्यालयांचे स्थलांतर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतरच सध्याच्या जागेचा ताबा ट्रस्टकडे सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या काळात ही संख्या लक्षणीयरीत्या वाढते. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विस्तार करणे या उद्देशाने फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्याची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर १९७६-७७ दरम्यान उभारण्यात आलेली ही इमारत अनेक दशकांपासून पोलिस प्रशासनाच्या कामकाजाचे केंद्र राहिली आहे. या इमारतीत पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय कार्यरत आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालय, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कार्यालय, सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग तसेच फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाणे याच इमारतीत कार्यरत आहेत. ही जागा पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळं प्रशासकीय दृष्ट्या देखील ही जागा मोक्याची जागा आहे. पण आता ही जागा खाली घेणार असल्य्याचं निश्चित झालं आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

दत्त मंदिराजवळ उभारली जाणार नवी अत्याधुनिक इमारत

बुधवार पेठेतील महापालिकेच्या मालकीच्या दत्त मंदिराजवळ असलेल्या जागेवर फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्यासाठी नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. ही जागा सिटी सर्व्हे क्रमांक १११२ आणि १११३ अंतर्गत असून तिचे क्षेत्रफळ ७५९.२० चौरस मीटर आहे. या जागेवर उपलब्ध असलेल्या ३.५ एफएसआयमुळे सुमारे २८ हजार ६२१ चौरस फूट बांधकाम करणे शक्य होणार आहे. सध्या फरासखाना पोलिस ठाण्याची जागा ८७३.७० चौरस मीटर असून विद्यमान इमारतीचे बांधकाम क्षेत्र सुमारे २२ हजार चौरस फूट आहे. प्रस्तावित नवी जागा सध्याच्या पोलिस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?