पुणे शहर पावसाची विश्रांती तर घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’; शहरात आकाश अंशतः ढगाळ पुणेकरांना संततधारेनंतर दिलासा

0

गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसानंतर शनिवारी (ता. २५) पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. शहरातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, काही ठिकाणी केवळ हलक्या सरी बरसल्या.दिवसभर ढगाळ वातावरण असूनही अधूनमधून ऊन पडल्याने वातावरणात बदल जाणवला. मात्र, शहरात उघडीप असली, तरी घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुण्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शहरात पावसाचा जोर ओसरला असला, तरी घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवामानशास्त्र विभागाने या परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शहर आणि परिसरात रविवारी (ता. २६) तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. रविवारी कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शहरात आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील. तसेच दुपारनंतर किंवा सायंकाळी अत्यंत हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

धरणांत पाणीसाठ्याची स्थिती (शनिवारी सायं. ५ पर्यंत)

धरण क्षमता (टीएमसी) आजचा साठा (टीएमसी) टक्केवारी पाऊस मिमी. एकूण पाऊस मिमी.

  1. खडकवासला १.९७ १.९७ १००.०० ०१ ५२८
  2. पानशेत १०.४१ ९.४४ ८८.६७ ११ १,५०६
  3. वरसगाव १२.८२ १०.६४ ८२.९५ ११ १,४४४
  4. टेमघर ३.७१ २.५३ ६८.१९ १६ २,०४३
  5. पवना ८.५१ ८.१८ ९६.०९ २४ १,९६५
  6. भामा आसखेड ७.६७ ७.१६ ९३.३७ ०५ ६४३
  7. वडिवळे १.०७ १.०५ ९७.८६ २१ १,६९८
  8. डिंभे १२.५० १०.९२ ८७.४५ १५ ८३८
  9. चासकमान ८.५४ ७.३५ ९६.९९ ०९ ६६१
  10. गुंजवणी ३.६९ ३.२० ८६.६६ ०५ १,३५८
  11. नीरा देवघर ११.७३ ९.७३ ८२.९२ १२ १,२२४
  12. भाटघर २३.५० १८.२२ ७७.५३ ०० ५५७
  13. वीर ९.४१ ९.४१ १००.०० ०० २८०
अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार