लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 लागू, पर्यटकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू

0

पुणे : लोणावळ्यात कलम 163 लागू करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता लोणावळ्यात कलम 163 लागू करण्यात आले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भागे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईट, शिवलंग पॉईट, पवना डॅम अशी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सध्या पावसाळा सुरु झालेला आहे. देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा आणि परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पोलीस अधिक्षकांनी पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची पहाणी केलेली आहे.

शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लोणावळा परिसरात बाहेरुन येणार पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी होवू नये. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात कलम 163 लागू करण्यात आले आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पवना डॅम परिसरामध्ये पर्यटक पर्यटनासाठी येतात. डॅमच्या पाण्यामध्ये उतरुन पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडते. तसेच मावळ तालुक्यातील आतवण येथील टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, पवना डॅम तसेच भाजे धबधबा येथे पर्यटक पर्यटनासाठी येत-जात असतात. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डोंगरावर गेलेले पर्यटक हे अचानक पाऊस आल्याने त्यामध्ये वाहून गेल्याने पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोणावळा ग्रामीण परिसरात भाजे धबधबा, स्लोहगड किरन्ना, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईट, लायन्स पॉइंट, पवना डॅम या ठिकाणी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 नुसार 6 जुलैच्या संध्याकाळी 6 वाजेपासून 31 जुलैच्या पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 163 लागू करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

लोणावळ्यात ‘या’ गोष्टींवर राहणार बंदी:

1) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे.

२) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली उभे रहाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

३) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक बळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

४) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गीक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे या गोष्टींवर बंदी घालण्यात आी आहे

५) वाहतुकीचे रस्ते, तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

६) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

८) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे आणि प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर आणि इतरत्र फेकण्यास बंदी आहे.

९) सार्वजनिक विकाणी येणाऱ्या महिलांशी छेडछाड करण्यांवर कारवाई केली जाईल.

१०) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा बाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर्स/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे यास बंदी राहील.

११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती न करणे.

१२) धबधबे, धरणे व नदी आदीच्या परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे.