पतित पावन संघटनेच्या पुणे शहर चिटणीसपदी महेश पाटोळे यांची निवड

0

पुणे: हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या पतित पावन संघटनेच्या पुणे शहर चिटणीसपदी श्री. महेश पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. पाटोळे हे दीर्घकाळापासून सामाजिक, संघटनात्मक तसेच हिंदुत्ववादी चळवळींमध्ये सक्रिय असून विविध उपक्रमांद्वारे त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवनियुक्त चिटणीस म्हणून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटनेशी जोडणे तसेच विविध सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना श्री. महेश पाटोळे यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.