उद्धव ठाकरे यांचे वर्धापन दिन मेळाव्यात भावनिक उद्गार; ‘डगमगलेलो नाही, खचणार नाही; क्षणात पक्षप्रमुखपद सोडेन

0

माझ्यावर आज जे आरोप होत आहेत ते जर तुम्हाला खरे वाटत असतील तर तुम्हीच ठरवा, मी एका क्षणात पक्षप्रमुख या पदावरून पायउतार होण्यास तयार आहे, असे भावनिक उद्गार उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात काढले. मी डगमगलेलो नाही, मी खचणारा नाही. आपल्यावर अनेक संकटे आली, वादळे आली पण मी पहाडासारखा उभा राहिलो. शिवसैनिक देतील ती जबाबदारी स्वीकारेन. पण माझी एकच अट असेल की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या हातात नको. कोणीही शिवसैनिक पुढे येऊ देत त्याला आपण पक्षप्रमुख बनवू, असे सांगून ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने देशाचे राजकारण सुरू आहे ते पाहिल्यानंतर जनतेचा विश्वास उडत चालला आहे. देश अराजकाकडे चालला आहे. देशातील तरूणांनी जर क्रांती केली तर तुमचे सरकार राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

सहा बंडखोर खासदारांचा संदर्भ देऊन ते म्हणाले की तुमच्या मतांवरच ते निवडून आले आहेत. वाट कशाची बघताय त्यांना जाब विचारा. लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे, आता आपल्याला सगळ्यांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल असेही ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, आजच्या मेळाव्यात खचलेले शिवसैनिक दिसतील, अशी अपेक्षा काहींनी केली होती. मात्र, एकही शिवसैनिक निराश दिसत नाही. चार खासदार, वीस आमदार आणि अनेक नगरसेवक पक्षासोबत असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवसेना ही वडीलोपार्जित देणगी असून ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान