राष्ट्रवादी अजित पवार गटात पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये

0

सध्या राज्यात ऑपरेश तुतारी आणि ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता पक्षावर नाराज असून, या सर्व पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावण्यात आली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील पक्षांना गळती लागल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यातील काही जण भाजपमध्ये देखील दाखल झाले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

दरम्यान पक्षाला लागलेली गळती थांबवणं हे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे मोठं आव्हान असतानाच त्यामध्ये ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी यांची देखील चर्चा सुरू झाली मात्र आता जी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

धुळे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार फारुक शहा पक्षावर नाराज आहेत. पक्षात वरिष्ठांकडून कोणतीही मदत तसेच विकास काम होत नसल्याने फारुक शहा पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार फारुक शहा यांनी बैठक घेतली आहे. आठवड्याभरात पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांसह माजी आमदार फारुक शहा पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फारुक शहा पुढच्या आठवड्यात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज