बौद्धजन सहकारी संघ अमृत महोत्सवानिमित्त ना. डॉ. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन

0

गुहागर दि. २५ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ (रजि.), मुंबई, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी या संघाच्या गाव आणि मुंबई शाखेच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव निमित्त गाव शाखेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या कालावधीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मुक्काम गाव जानवळे (शृंगारतळी) येथे मा. नामदार डॉ. उदय सामंत (महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री व पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) यांच्या शुभहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमा प्रसंगी धार्मिक पूजापाठ पूज्य भंते विमलबोधी व संस्कार समितीच्या वतीने करण्यात येईल तर पाहुण्यांचे स्वागत मुंबई शाखा अध्यक्ष अशोक कदम यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. सदर कार्यक्रमा निमित्त दिवसभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून दुपारी ३:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत महाधम्म रॅली मोठ्या दिमाखात काढण्यात येणार आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन गाव शाखेचे चेअरमन मारुती धोंडू मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०:०० ते रात्री १०:०० या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मुक्काम गाव जानवळे (शृंगारतळी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत मुंबई शाखा चेअरमन दिपक मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात येईल, दिवसभरात विविध बौद्धिक, शारीरिक,प्रबोधनात्मक, करमणुकीच्या कार्यक्रमांचे तसेच महिलांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून रात्री ठीक १०:०० वाजता निखिल विजय गमरे आणि कोकणकन्या कु. तेजल जाधव यांच्या जंगी कव्वालीच्या सामन्याचे आयोजन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती, रत्नागिरी जिल्हाचे सदस्य सुरेश भिकाजी सावंत यांच्या सौजन्याने सादर करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, गुहागर विधानसभेचे माजी आमदार डॉ. विनयजी नातू, पंचायत समिती गुहागरचे उपसभापती निलेशजी सुर्वे, गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. निता विकास मालप, गुहागर तालुक्याचे तहसिलदार परिक्षीतजी पाटील, गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी परेशजी शिरसाट, गुहागर विधानसभेचे आमदार भास्करशेठ जाधव, पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणवजी पोळेकर, गुहागर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेशजी बेंडल, गुहागर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रदीपजी बेंडल, पोलीस निरीक्षक सचिनजी सावंत, सीईओ स्वप्निलजी चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर प्रसंगी गाव व मुंबई विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती विभाग अधिकारी, उपसमित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी गाव व मुंबई विभागातून सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी सदर सोहळ्यास आपल्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही