पुण्याच्या महसुलात ६०० कोटींची वाढ; मिळकतकर अन् बांधकाम विभाग ५ हजार ३२६ कोटी रुपये जमा!

0

पुणे महापालिकेच्या मिळकतकर आणि बांधकाम विभागाने यंदा पाच हजार ३२६ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. यात मिळकतकराचा वाटा दोन हजार ९८५ कोटी, तर बांधकाम विभागाचा वाटा दोन हजार ३४१ कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मिळकतकरात ६०० कोटींची वाढ झाली आहे.

मिळकतकर विभागाने तीन हजार २५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. अभय योजनेमुळे विभागाला ९५४ कोटी ७८ लाख रुपये मिळाले. त्यामुळे उद्दिष्टाच्या जवळ पोहोचता आले. सुट्ट्यांच्या काळातही ग्राहक सुविधा केंद्रे सुरू ठेवल्याने आणि ऑनलाइन सुविधेमुळे कर संकलनास मदत झाली. दुसरीकडे, बांधकाम विभागाने २ हजार ८५३ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २ हजार ३४१ कोटी ८४ लाख रुपये मिळवले. जमीन मोजणीच्या तांत्रिक अडचणींमुळे या विभागाच्या महसुलावर परिणाम झाला. मात्र, एकट्या मार्च महिन्यात विभागाने ५८८ कोटी ८२ लाखांची कमाई केली आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

बांधकाम विभागाकडून बांधकाम परवानगीपोटी यंदा २ हजार ३४२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. जमीन मोजणीच्या विषयामुळे यंदा महसुलास फटका बसला असला, तरीही मार्चमध्ये ५८८ कोटी रुपयांचा महसूल विभागाने मिळवला आहे.

– अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, महापालिका

मिळकतकर विभागाला यंदा दोन हजार ९८५ कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. त्यामध्ये अभय योजनेद्वारे ९५४ कोटी रुपये मिळाले आहेत.

– रवी पवार, प्रमुख, मिळकतकर आकारणी विभाग

असा मिळाला मिळकतकर

१ मार्च २०२५ ते १ मार्च २०२६ पर्यंत जमा झालेला मिळकतकर : २,९८५ कोटी ६७ लाख रु. (सायंकाळी सातपर्यंत)

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

मिळकतधारकांची संख्या : १४,९७,०००

डिजिटल प्रणालीद्वारे पद्धतीने जमा झालेला कर : १,५९० कोटी ७६ लाख रु.

मिळकतधारकांची संख्या : ७,५०,०००

धनादेशाद्वारे जमा झालेला कर : ९८५ कोटी २५ लाख रु.

मिळकतधारकांची संख्या : १,२८,०००

रोख रकमेद्वारे जमा झालेला कर : ४०९ कोटी ६६ लाख रु.

मिळकत धारकांची संख्या : २,५३,०००