कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय “८ मार्च जागतिक महिला दिन” निमित्त महिला सफाई कामगारांचा विशेष सन्मान!

0

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास व समाज विकास विभागाच्या वतीने दि. १७/०३/२०२६ रोजी प्रभाग क्रमांक ३१, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी अंतर्गत “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता पूर्व स्पर्धा पुरस्कार” च्या अनुषगांने कमिन्स हॉल येथे “८ मार्च जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त अविनाश सकपाळ, उपआयुक्त संतोष वारूळे, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदशनाखाली शिवाय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, गणेश खिरिड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुभांर, किरण जाधव यांच्या निरिक्षणा खाली डिस्ट्रिक्ट को – डायरेक्टर किरण इंगळे, रोटरीच्या अध्यक्षा रुमा आगवेकर, सेक्रेटरी अपर्णा शहा, प्रतिभा जगदाळे यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन सार्वजनिक स्वच्छता विभागात शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दररोज पहाटेपासून पाऊस, ऊन, वारा, थंडी याची पर्वा न करता परिश्रम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारच्या हृदयस्पर्शी भावना व्यक्त करण्यात आल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी ६० महिला सफाई कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाची साडी चोळी देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

तसेच कार्यक्रमात “महिला सबलीकरण व महिलांचा प्रत्यक्ष सहभाग”, या विषयी विधीतज्ञ ॲड. प्रिती परांजपे यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्त्याचारा विरुद्ध लढण्यासाठी अनेक कायद्याच्या कलमांविषयी तसेच समाज विकास विभागाच्या समुपदेशक अनुराधा जगताप यांनी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या महिला सबलीकरणा संदर्भात महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नती विषयीच्या विविध योजना विषयीची इत्यंभूत माहिती दिली. तसेच पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या मा. उपाध्यक्षा कॉ. शोभा बनसोडे यांनी “८ मार्च जागतिक महिला दिन” का? साजरा करतात याविषयी ऐतिहासिक कालखंडातील घडलेल्या घटना व महिलां चळवळीच्या इतिहासातील दाखले देऊन विशेष मार्गदर्शन केले. तसेच “महिलांनी स्वयंपाक करताना दुर्घटने प्रसंगी लागलेल्या आगीपासून संरक्षण कसे करावे” याविषयी कोथरूड अग्निशामक केंद्राचे प्रमुख प्रकाश गोरे यांनी प्रात्यक्षिकेद्वारे मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

सदर कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक पृथ्वीराज दादा सुतार, ॲड. वासंती जाधव,ज्योत्स्ना कुलकर्णी, नवनाथ जाधव, जगन्नाथ कुलकर्णी, बाळसाहेब दांडेकर इत्यादी उपस्थित राहून जागतिक महिला दिना निमित्त शुभेच्छा दिल्या व प्रातिनिधीक स्वरुपात काही अधिकारी, महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब व मोगरा रोपटे देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यकमास समाज विकासचे संदीप कांबळे, समूह संघटीका उमा मते, शितल ठोसर, स्वाती ढगे व सर्व आरोग्य निरिक्षक व मोकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोकादम वैजीनाथ गायकवाड प्रास्ताविक आण्णा ढावरे व समारोप आरोग्य निरिक्षक करण कुंभार यांनी केले.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण