मोरे विद्यालयाजवळ ‘स्वच्छ’ कचरा संकलन केंद्रास आग; नगरसेविका मनीषाताईंच्या दक्षतेने ही मोठी हानी टळली

0

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील मोरे विद्यालयाजवळ आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कचरा संकलन केंद्राला अचानक आग लागली; स्थानिक नगरसेविका मनिषा ताई बुटाला यांच्या दक्षतेमुळे परिसरातील नागरिकांचे होणारे मोठे नुकसान टळले आहे. स्थानिक नगरसेविका मनिषाताई बुटाला यांनी कार्य तत्परपणे संबंधित ठिकाणी भेट देऊन तातडीने अग्निशामक दलाची गाडी बोलावून आग आटोक्यात आणण्यास मोलाचे सहकार्य केले. सदरील घटनेच्या शेजारीच अन्न वितरण केंद्र असल्याने वितरित करण्यासाठी आलेला अन्नधान्याचा साठा जळण्याची भीती लक्षात घेऊन तातडीने पावले उचलत मनीषाताई बुटाला यांनी गोरगरिबांच्या हक्काचा शिधा वाचवण्यात मोलाचे योगदान दिले. आग लागण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आणि आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

पुणे महापालिकेच्या कचरा संकलन विभागामार्फत परिसरातील कचरा संकलन करताना जमा झालेल्या सुक्या कचऱ्यातील वस्तू या ठिकाणी वारंवार जमा केल्या जात असल्याने कायम या परिसरात आगीचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका सौ. मनीषाताई संदीप बुटाला यांनी यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुहास जाधव साहेब यांच्याशी तातडीने संपर्क साधून या ठिकाणी पुढे कचरा साठवू नये अशी मागणी केली.

सुका कचरा संकलन केंद्रास लागलेल्या या आगीमुळे शेजारील शासकीय धान्य वितरण (रेशनिंग) दुकानालाही झळ बसली. आग नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागल्याने सुमारे 400 पोती धान्य भिजले. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पंचनामा करून घेण्याची विनंतीही करण्यात आली. कोथरूडचे आमदार व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, मा. दादांनी आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती नगरसेविका मनीषाताई बुटाला यांनी माध्यमांना दिली

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक