माणुसकीचा हात फाऊंडेशनचे महिला सक्षमीकरण योगदान भविष्याची वाटचाल करण्यास प्रेरणादायी: अल्पनाताई वर्पे

0

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणुसकी हिच खरी सेवा हे ब्रीदवाक्य जगणाऱ्या माणुसकीचा हात फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध स्तरांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा केला जाणारा सन्मान हा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिणींसाठी प्रेरणादायी ठरणार असून अन्य महिलांनाही यामध्ये प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत पुणे महापालिका महिला बालकल्याण समितीचे अध्यक्ष अल्पनाताई वर्पे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्श महिला गौरव पुरस्कार २०२६ वितरण कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या.

समाजातील विविध स्तरांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्यानंतर अन्य महिला भगिनींसाठी त्या प्रेरक ‘रणरागिणी’ प्रेरणास्तोत्र बनत असतात. विशिष्ट हेतूने आपापल्या क्षेत्रामध्ये हे संपादित केलेल्या महिलांचा सन्मान हा केवळ व्यक्तिगत नसून संस्थात्मक व उद्दिष्ट प्राप्तीच्या कार्याचा सन्मान असतो. समाजात आज असंख्य महिला आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी अहोरात्र कष्ट उत्सवत असताना माणुसकीचा हात फाउंडेशन सारखे समाजसेवी समूह त्यांना सन्मान देण्याचे काम करत असल्याने केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान घडतो असेही अल्पनाताई वर्पे यांनी यावेळी बोलताना म्हटले.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

या कार्यक्रमांमध्ये माणुसकीचा हात फाउंडेशन तर्फे सौ. मधुराताई वाचल आदर्श महिला फुड ब्लॉगर पुरस्कार (मधुराज् किचन), सौ. निकीता मनोज शिंगुस्ते आदर्श महिला रीलस्टार पुरस्कार, सौ. अंजू बाळासाहेब माने आदर्श महिला कृतज्ञता पुरस्कार, अॅड. डॉ. रोहिणी पवार आदर्श महिला वकिल पुरस्कार, सौ. मनिषा राजेंद्र खेडेकर आदर्श माता पुरस्कार, सौ. तेजस्विनी सावंत, कु. मयुरी रोकडे आदर्श महिला खेळाडू पुरस्कार, प्रा.सौ. शोभा वाघमोडे आदर्श महिला वैज्ञानिक पुरस्कार, कु. तृप्ती शाम निंबळे आदर्श महिला बॉक्सिंग खेळाडू पुरस्कार, सौ. श्रुती वैभव कढणे आदर्श महिला पोलिस पुरस्कार, सौ. वैशाली विभीषण शिवडे आदर्श महिला वकिल पुरस्कार, श्रीमती आकांक्षा देवभानकर आदर्श महिला योग शिक्षिका पुरस्कार, सौ.सीमा वाघमोडे आदर्श महिला समाजसेविका पुरस्कार, सौ. वंदना बजरंग प्रक्षाळे आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार, सौ. वर्षा कसबे आदर्श महिला पोलिस अॅडमिन पुरस्कार सौ. नलिनी गायकवाड, सौ. अमृता उतेकर, सौ. भाग्यश्री निढाळकर आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार, सौ. शिवानी पांढरे आदर्श महिला पत्रकार पुरस्कार महिलांचा  सौ. अल्पनाताई गणेश वरपे (अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती पुणे मनपा) यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

सदरील कार्यक्रम यशस्वी संयोजित करण्यासाठी संस्थापक श्री. बाळासाहेब भालेराव, अध्यक्ष, माणुसकिचा हात फाऊंडेशन सौ. आरतीताई केतन तेंडले, सौ. सुरेखाताई इंगळे, श्री. भीमराव रणसिंग, श्री. शिवाजी ओव्हाळ, श्री. बाळासाहेब आंग्रे, सौ. शीतलताई सरोदे यांच्यासह फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महा.राज्य) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आल्याने कार्यक्रमाबद्दल अनेकांच्या मनामध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.