श्री महाकालेश्वर मंदिर कर्वेनगर महाशिवरात्री उत्साहात साजरी

0

श्री महाकालेश्वर मंदिर कर्वेनगर श्री शंभू महादेव मंदिर सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाकालेश्वर मंदिर आणि शिवलिंगाला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

ही आरास राजु खाडे,प्रशांत गुंजाळ, आकाश मोहळ, सागर वैराट यांनी साकारली होती.तसेच सकाळी रुद्राभिषेक पूजा करुन दुपारी कर्वेनगर परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तसेच प्रसाद देखील वाटप करण्यात आला.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण