वारजेतील भाजपा ‘जपली का विकली’ यक्षप्रश्न निकाली निघणार; नाराजींच्या संदेशात संपूर्ण वारजे ‘भरगच्च’ भरले

0

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वारजे माळवाडीचा गड सर करण्यास भाजपने अनपेक्षित चाल खेळत ज्या घरांमध्ये पिढ्यानपिढ्या सत्ता होती त्याच घरातील ३ चेहरे (खुल्या गटातील तीनही जागेसाठी)पुन्हा भाजपाशी केले; त्यामुळे वारजे भाजपा ‘जपली का विकली’ हा एक प्रश्न आज प्रसिद्ध होणाऱ्या भाजपा उमेदवाराच्या यादीमध्ये सुटणार आहे. वारजे माळवाडीत गेली 30 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष जपण्याचं जोपासण्याचे आणि वाढवण्याचे काम केलं त्या सर्व ‘हळव्या’ मनांना मीठ चोळण्याचे काम पक्षाने केलं की उर्वरित जागी संधी देऊन कार्यकर्त्यांना ताकद देणार याची जाणीव भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारी यादीमध्ये होणार आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

पुणे महापालिकेत समावेश झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलरनगर-शिवणेमध्ये कमळ विजयी करणे शक्य झालं नाही. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे विजयाचं नियोजन ‘दिवास्वप्न’च राहतंय की काय अशी शंका असल्याने भारतीय जनता पक्षाने विद्यमान तीनही विरोधी पक्षातील नगरसेवकांना भाजपवाशी केले. वरिष्ठ पातळीवरून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असला तरी सुद्धा स्थानिक पातळीवर प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झाली असून भारतीय जनता पक्षाला याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकरता येत नाही. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांना भाजपवासी करण्यात आले असले तरीही तिघांची स्वतंत्र निवडणुकीची तयारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी यामधून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कसोटी लागणार आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

वारजे माळवाडी पुणे महापालिकेत तीस वर्षांपूर्वी समाविष्ट झाली असला तरीही पश्चिमेकडील इतर उपनगरांप्रमाणे(बावधन बाणेर बालेवाडी) विकास शक्य झाला आहे का? विकास आराखड्यातील रखडलेले प्रकल्प, रस्ते आणि सोयी सुविधा नसल्याने प्रचंड नाराजी असताना रोष ओढवलेले चेहरे जनमतासाठी ठेवले आहेत. विरोधकांची ताकद कमी करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विद्यमान नगरसेवक पक्षप्रवेश करून भाजपवासी करण्यात आले असली तरी जनरोषामुळे ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याची भीती निर्माण झाली आहे. वारजे माळवाडी परिसरामध्ये अनपेक्षित प्रवेश झाल्यापासून नाराजीच्या तुफान चर्चा सुरू असून परिसरामध्ये फक्त आणि फक्त त्याच विषयावर चर्चा रंगत आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्ष मोठे मोहरे गळाला लागले म्हणून निश्चित झाली असली तरीही विरोधकांनीही आपला डाव साधत सक्षम चेहरे एकत्र करण्याचे नियोजन केले आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं