“वारसा सेवेचा…नातं विश्वासाचं” जपत ॲड. ओंकार कामठे यांची प्रभाग ०५ च्या विकासासाठी नव्या पर्वाची हाक

0

फुरसुंगी : “नेतृत्व म्हणजे फोटो काढणं नव्हे, तर लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणं आहे,” या विचारातून कार्यरत असलेले ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी प्रभाग क्रमांक ०५ मध्ये सेवेचा वारसा आणि विश्वासाचं नातं दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आधी केलं… मग सांगितलं!” या भावनेतून काम करत गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

स्वर्गीय सी.ए. मच्छिंद्र कामठे (सी.ए.साहेब) यांच्या कार्यातून प्रेरित होत, ओंकार कामठे यांनी त्यांच्या सेवाभावाचा वारसा पुढे चालवण्याचं ध्येय घेतलं आहे. फुरसुंगीचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या सी.ए. साहेबांनी नगरपरिषदेची संकल्पना साकार करताना धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शेकडो उपक्रम राबवले. त्या कार्याची परंपरा आजही ओंकार कामठे स्वतःच्या कृतीतून जपत आहेत.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

‘एक कॉल… प्रॉब्लेम सॉल’ या संकल्पनेवर काम करताना त्यांनी नागरिकांच्या प्रत्येक समस्येकडे वैयक्तिक जबाबदारीने पाहिलं. त्यांच्या पुढाकाराने पांडवदंड ते सातदेवी वस्तीपर्यंत एलईडी स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आल्या, ड्रेनेज लाईनची स्वच्छता आणि नवी उभारणी करण्यात आली, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, मंदिर सभामंडप बांधकाम, विरंगुळा कट्टे, महिला मोफत देवदर्शन योजना, महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य, तसेच ₹५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा योजना या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

युवकांसाठी रोजगार मेळावे, नवरात्र शिधा, दिवाळी भेटवस्तू यांसारख्या सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील घटकांमध्ये संवाद आणि आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यांनी सातत्याने केला आहे. “मनाशी संवाद… माणसाशी नातं” ही कार्यसंस्कृती टिकवून ठेवणं हेच त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या नव्या पर्वात सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी वर्ग आणि नोकरदार कुटुंबांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, विकासाच्या प्रत्येक योजनेत जनतेचा सहभाग वाढावा, या हेतूने काम करण्याचा निर्धार ॲड. कामठे यांनी व्यक्त केला.

“तुमचं एक मत म्हणजे माझ्यासाठी विश्वासाचा शिक्का आहे. हे मत माझ्या प्रत्येक निर्णयात लोकहिताचा आवाज बनेल,” असं सांगत त्यांनी नागरिकांकडून आशीर्वाद आणि पाठिंबा मागत विजयाचा निर्धार वक्त केला.