केंद्रीय मंत्र्यासोबत रेल्वेत काय घडलं? रात्री बसले एका ट्रेनमध्ये, सकाळी सापडले दुसऱ्या ट्रेनमध्ये; हाता-पायालाही दुखापत

0

रात्री गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसलेले केंद्रीय मंत्री जुएल उरांव हे दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनमधून बेपत्ता होते. ते अचानक गायब झाल्यानं खळबळ उडाली होती. जेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा ते दुसऱ्याच एक्सप्रेसमध्ये जखमी अवस्थेत आढळून आले.त्यांच्या हाता पायला दुखापत झाली होती. केंद्रीय मंत्री जुएल उरांव हे दिल्लीहून जबलपूरला जात होते. शनिवारी रात्री ते गोंडवाना एक्सप्रेसमध्ये बसले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये सापडले. ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली होती. ३ तासांच्या शोधमोहिमेनंतर ते जखमी अवस्थेत सापडले.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केंद्रीय मंत्री जुएल उरांव गोंडवाना एक्सप्रेसमध्ये शनिवारी रात्री हजरत निजामुद्दीन स्टेशनवर बसले. पण रविवारी सकाळी दमोहमध्ये त्यांची सीट रिकामीच होती. यानंतर मोठी खळबळ उडाली. रेल्वेकडून सर्च ऑपरेशन सुरू केलं. जवळपास २ तास शोधानंतर १६२ किमी दूर अंतरावरील स्टेशनमध्ये ते सापडले. संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या कोच बी३ बर्थमध्ये ते होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री सकाळी पावणे चारच्या सुमारास दमोह स्टेशनवर उतरले. त्यांची साखरेची पातळी कमी झाली होती. त्यावेळी ते ट्रेनमध्ये चढताना पाय घसरला आणि पडले. त्यात त्यांच्या हाता पायाला दुखापत झाली. त्याचवेळी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये ते बसले.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

मंत्र्यांच्या पीएला ही गोष्ट चारच्या सुमारास लक्षात आली. तेव्हापासून तपास सुरू होता. सकाळी सातच्या सुमारास केंद्रीय मंत्री सिहोरा स्टेशनजवळ सापडले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर जबलपूरला आणण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सर्व स्टाफला अलर्ट करण्यात आलं होतं. जबलपूरला पोहोचताच मंत्री जुएल यांना सुरक्षा देण्यात आली. अद्याप यावर मंत्र्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.