0

१मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बाभुळसर बू!ग्रामपंचायत कार्यालय समोर मनोज मचाले संत तुकाराम सोसायटी चेअरमन यांच्या हस्ते ध्वजास श्रीफळ वाढवून तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते पूजन करून , ध्वजारोहण सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाभुळसर विका सहकारी संस्था चेअरमन भरतभाऊ नागवडे, मा.सरपंच गणेश मचाले, माजी उपसरपंच सुनील देशवंत, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, पोलिस पाटील मीना पाडळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष नागवडे, महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रामदास नेते नागवडे, जयवंत नागवडे शिरूर तालुका सरचिटणीस राशप गट, सचिन नागवडे संचालक बाभुळसर वि.का, सोमनाथ नागवडे, नानासो नागवडे, भोसले महाराज, दत्तात्रय वाल्मिक नागवडे चेअरमन कशिमाई दूध संस्था, दिलीप बाप्पू नागवडे, बाळासो थोरात, ग्रामसेवक गायकवाड, अमित नागवडे, कृष्णा पाडळे, शिपाई भंडलकर, मुख्याध्यापक चवधर, कोथिंबीरे सर, प्रतिभा म्हस्के, मीना माने आदी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

यादिनानिमित्त सर्व ग्रामस्थांनी गावा मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सरपंच, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाचा चावडी वाचन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी चावडी वाचन केले.