कोथरूड भीमजयंती निमित्त महाबुद्धवंदनेस ‘भीमसागर’ लोटला; समाजभूषण अन् समाजरत्न पुरस्कार प्रदान

0

पुणे – कोथरुड भीम महोत्सव समिती आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना हा सामूहिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जन सामान्यात पोहचावे, आणि आंबेडकरी चळवळ सशक्त करणे या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणे  हा उद्देश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व गौतम बुद्ध याना समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देउन्न मानवंदना दैन्यात आली. पहलगाम येथिल अतिरेकी हल्ल्यातील मृत देशबांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवर आणि हजारो समाजबांधव आणि नागरीक यांच्या साक्षीने महाबुद्ध वंदना पार पडली.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख श्री गजानन थरकुडे, भाजपा नेते श्री शामराव देशपांडे, भारतीय दलित कोब्राचे प्रमुख एडवोकेट भाई विवेक चव्हाण, बिग बॉस फेम फिल्म अभिनेते अभिजीत बिचुकले, पतीत पाहून संघटना शहर प्रमुख श्रीकांत शिळमकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष  ॲड. अरविंद तायडे, संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, उमेश भेलके, योगेश राजापूरकर, गिरीश भेलके, दुष्यंत मोहोळ, गणेश वरपे, नवनाथ जाधव, मारुती वरवे, अनिरुद्ध खांडेकर, संतोष लांडे, अर्चना चंदनशिवे, नितीन शिंदे, अजय भालशंकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट सामाजिक योगदानाबद्दल गायक साजन बेंद्रे यांना समाजभूषण तर समाजरत्न म्हणून श्री जनार्दन साळवे, रमेश पाटोळे, बाबासाहेब जाधव, ॲड.गोरक्ष लोखंडे, वैजनाथ गायकवाड, छाया भोसले, किशोर दळवी, दशरथ खांकाळ, निवृत्ती वाघमारे आदींचा सम्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट बुद्धविहार पुरस्कारामध्ये सारनाथ बुद्धविहार कोथरूड, भीमरत्न बुद्ध विहार बालेवाडी, सम्यक बुद्ध विहार श्रीकृष्णनगर यांना पुरस्कार देण्यात आले. जयंतीच्या निमित्ताने राज्याची लाडकी जोड़ी साजन- विशाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बापूसाहेब डाकले, उपाध्यक्ष बाळासाहेब खांकाळ, नामदेव ओव्हाल, दीपक कांबले, विजय सावंत, दीपक सगर, जितेश दामोदरे, वसंत ओव्हाल, सतीश रणवरे, अमर पांडागळे, विशाल सरवदे, अमित तुरुकमारे, भारत भोसले, वसंतराव ओव्हाळ, के जी पवळे, राजाभाऊ गायकवाड, अमोल जगताप, नामदेव ओव्हाळ, उमेश कांबळे, सिद्धार्थ उजागरे, सचिन ढाकले, संतोष शेडगे, अशोक जाधव, कैलास कदम, दिनेश चव्हाण, विनोद पाटोळे, जितेश दामोदरे, कचरू खळगे, संतोष म्हस्के, दीपक सगर, विनोद बचुटे आणि इतर कोथरूड महोत्सव समितीच्या सदस्यांनी यशस्वी आयोजन केले.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

 – बुद्धम शरणम् गच्छामी, शरण बुद्धास.. शरण धम्मास.. शरण संघास.. मी भीमराया। या भीमगीताने सुरुवात झाली. साजन विशाल यांच्या भीम गीतांनी माहोल दणाणून सोडला. परिसरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले तर आभार बाळासाहेब खंकाळ यांनी मानले.