डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ कूपनचे अनावरण आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न

0

मुंबई दि. ११ (रामदास धो. गमरे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ स्पर्धकांना अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत, सदर लकी ड्रॉ च्या लकी कुपनचे अनावरण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विभागीय कार्यकारणी पदाधिकारी संतोष दामाजी जाधव, प्रवीण तांबे (गुरुजी), राजू धोत्रे, हरिष मोरे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे, सरचिटणीस संदीप मोहिते, प्रज्वल सकपाळ, प्रणित वीर, सौरभ मोहिते आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

सदर लकी ड्रॉ मध्ये

प्रथम बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून ३ वेळा L D रिसोर्टची सहल, द्वितीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून २ वेळा L D रिसोर्टची सहल, तृतीय बक्षीस २ व्यक्तींसाठी वर्षातून १ वेळा L D रिसोर्टची सहल व इतर १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. सदर विनामूल्य लकी ड्रॉ चे लकी कूपन दि. ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा कार्यालय, सावित्रीबाई फुले वसाहत भोईवाडा, बेस्ट कर्मचारी वसाहत शेजारी येथे उपलब्ध होतील व या लकी ड्रॉ ची सोडत मंगळवार दि. २२ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ८:०० वाजता होईल, तरी जास्तीत जास्त लोकांनी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं