मोठी बातमी: शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात, मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक

0

शिवसेना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारा जवळ हा अपघात घडला. अपघात झाला त्यावेळी खासदार वायकर गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. या अपघातात कुठली जीवित हानी किंवा कोणी जखमी झालाय का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. खासदार रवींद्र वायकर कडून वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वनराई पोलीस हा अपघात होता की काही घातपात या संदर्भात रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

रविवारी मध्यरात्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी खासदार वाईकरही गाडीत असल्याचं समजतंय. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची रविवारी मध्यरात्री धडक झाली. अपघात झाला त्यावेळी रविंद्र वायकरही गाडीत होते. अपघातात जीवित हानी किंवा कोणी जखमी असल्याची माहिती अद्याप मिळालेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती

या अपघाताबद्दल मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार खासदार रवींद्र वायकर यांच्या कारच्या अपघातात टेम्पोची वायकरांच्या गाडीला धडक दिली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या दुर्घटनेत पोलीस चौकशी सुरू आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर?

रवींद्र वायकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ केली. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार आहेत. 2092 पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून येत 2009 मध्ये विधानसभेत वाईकर यांनी एंट्री घेतली. 2014 च्या फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण व उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलं. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्ती करांचा पराभव करत विजय मिळवलाय

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?