वेताळ टेकडी पालकमंत्री चंद्रकांतदादा दिशाभूल करत आहेत; फक्तं काम थांबलं आहे रद्द नाही: चंद्रकांत मोकाटे

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर संवाद साधताना पालकमंत्री म्हणून मोठ्या वल्गना करताना स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम करत असून बालभारती ते पौडफाटा हा रस्ता असून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सूचना देण्यामध्ये स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांचाही समावेश आहे. यांना फक्त नागरिकांची दिशाभूल करून मते मिळवण्याचा हेतू असून कोथरूडच्या अस्मिता वेताळ टेकडी जर टिकवायची असेल दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाला नाकारण्याची गरज असल्याचेही चंद्रकांत मोकाटे म्हणाले.

कोथरूडची अस्मिता असलेल्या वेताळ टेकडी संवर्धनासाठी पौड फाटा ते बालभारती या रस्त्याला तत्कालीन पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही रस्त्याची पाहणी करून त्याला विरोध केला होता. सर्व पर्यावरणवादी शिष्टमंडळांनी पुणे महापालिकेच्या पथविभागा प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर संबंधित रस्ता पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचेच आदेश असल्याची धक्कादायक माहिती मिळाली असतानाही फक्त मत मिळवण्यासाठी सध्या चंद्रकांतदादा जनतेची दिशाभूल करतायेत. त्यांच्याच मंत्रिमंडळाने या रस्त्याला मंजुरी दिलेली असताना या रस्त्याला चंद्रकांतदादा स्थगिती कशी देऊ शकतात प्रश्न पर्यावरणवादी विचारत आहेत पुणेकर आणि कोथरूडकर जनतेची घोर फसवणूक चंद्रकांत दादा करतायेत असेही शिवसेना उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

माननीय नरेंद्र मोदीजी यांची पर्यावरण रक्षणाची चळवळ म्हणून ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करण्याची भीमगर्जना करत कोथरूड जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले असून कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर जी झाडे लावली आहेत असे सांगण्यात येते ती पूर्वीपासूनही होतीच यामध्ये काहीशी वाढ झाली म्हणजे सर्व झाडे त्यांनी लावली असे होत नाही. मोठ्या वर्गाना करण्याच्या वृत्तीमुळे फक्त लोकांच्या टाळ्या मिळतात पण सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर निर्मळ काम ही गरजेचे आहे अशी टीकाही यावरून चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?