सम्यक कोकण कला संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन

0

मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) कलावंतांचे माहेरघर म्हणून विख्यात व सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रगण्य असणाऱ्या सम्यक कोकण कला संस्थेच्या पदाधिकारी, सभासदांची सर्वसाधारण सभा मंदार कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी घेणे, विजयादशमी कार्यक्रमाचे आयोजन करणे, संविधान दिन साजरा करणेबाबत नियोजन, सन २०२५ ची दिनदर्शिका छपाई करणे व अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय या विषयांवर चर्चा करून सभागृहात सर्वानुमते ठराव मंजूर करून घेण्यात येतील तरी सर्व पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सरचिटणीस नरेश शिंदे यांनी संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार