रशिया हादरलं, चर्चवर दहशतवादी हल्ला, 17 पोलिसांसह अनेकांचा मृत्यू , 6 हल्लेखोरांचा खात्मा

0

रशियातील डागेस्तान प्रांतातील दोन शहरांवर रविवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यामध्ये 17 पोलिस आणि चर्चेमधील फादर यांच्यासह अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रशियातील डागेस्तान भागात सैन्याचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशियातील रस्त्यांवर टँक आणि स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले असून गेल्या 9 तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात अधिकारी, एक धर्मगुरू आणि एका चर्चच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. दागेस्तानमधील डर्बेंट आणि मखाचकला या दोन शहरांमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शोक दिवस घोषित करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

एकाच वेळी दोन चर्चवर हल्ला

रशियामध्ये हल्लेखोरांकडून एकाच वेळी दोन अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात डर्बेंट आणि मखचकाला शहरीत चर्चचा तसेच पोलिस स्टेशनचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी चर्चमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. एवढंच नव्हे तर दहशतवाद्यांनी डर्बेंटमधील फादर निकोले यांची देखील हत्या केली. क्रूरकर्मा दहशतवाद्यांनी त्यांचा थेट गळा कापला. मखचकला आणि डर्बेंटमध्ये प्रार्थना सभांवर हल्ला करण्यात आला. तसेच डर्बेंटमध्ये प्रार्थना सभेत आग लावण्यात आल्याने तो भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाचीही हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ऑपरेशन लाँच करण्यात आले असून यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

हल्ल्यानंतर रशियन सैनिक ॲक्शन मोडवर

मखचकला येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर रशियन कमांडो ॲक्शन मोडवर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी चर्चवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न

अज्ञात हल्लेखोरांनी सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला नेमका कोणी आणि का केला याचा शोध सुरू असून मृत झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 लोकांनी चर्चेमध्ये आश्रय घेतला होता. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचे आणि घाबरून जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?