प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज पुरविण्याचे लक्ष्य या योजनेची प्रभावी अंमलबजावणी; 1 कोटी घरांना फायदा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरु होत आहे. पीएम सुर्योदय योजनेचा निवडणुकीपू्र्वी गाजावाजा झाला. पीएम सूर्य घर योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ही योजना 75,000 कोटी रुपयांची आहे. 1 कोटी घरांना प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज पुरविण्याचे या योजनेचे लक्ष्य आहे. या योजनेमुळे ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळेल आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. या योजनेतंर्गत नागरिकांना त्यांच्या छतावर सोलर पॅनल लावता येतील. योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी यासाठी सवलतींचा पाऊस पडला आहे.

काय आहे ही योजना

PM Surya Ghar Yojana मध्ये सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येईल. या योजनेसाठी ग्राहकांना सबसिडी मिळणार आहे.ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळेल. अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळेल. या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल. https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

अशी मिळेल सबसिडी

या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना सबसिडी देण्यात येत आहे. ग्राहक किती किलोवॅटचे सोलर पॅनल बसवतो, त्यावर तितकी सबसिडी मिळेल. एक किलोवॅट (1 KW) सोलर पॅनल लावल्यावर सरकार 18,000 रुपये सवलत देते. तर 2 किलोवॅटच्या पॅनलवर 30 हजार रुपये सबसिडी मिळते. तर 3 किलोवॅटचे पॅनल लावल्यास सरकार 78 हजार रुपयांची सवलत देते.

मिळाला मोठा प्रतिसाद

छतावर सोलर पॅनल लावून वीज निर्मितीच्या पीएम सूर्योदय योजनेला (PM Suryoday Yojana) मोठा प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यापासून या योजनेसाठी नाव नोंदणीला सुरुवात झाली. पीएम सूर्य घर योजनेसाठी नोंदणी सुरु झाली. असम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळानाडू आणि उत्तर प्रदेशमधून योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

कोणाला करता येईल अर्ज

कोणताही भारतीय नागरीक, संस्था स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी. हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी.

अर्जदाराकडे वीज जोडणी असावी

कसा कराल अर्ज h ttps://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा. या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा.या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल. भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लागतील.