महायुतीला टेन्शन देणारा पोल भाजपला 14 ते 17 जागा; ‘मविआ’ला संजीवनी देणारा मोठा दिलासा?

0

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी काही ओपिनियन पोल समोर आले आहेत. यातील एका पोलने महायुतीच्या चिंतेत भर घातली आहे. लोक पोलच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. तर समजून घेऊयात पोलचे कौल काय आहेत? लोक पोल या निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणाऱ्या आणि ओपिनियन पोल घेणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचा पोल प्रसिद्ध केला आहे. या पोलनुसार महायुतीला धक्का बसताना दिसत आहे.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 1350 सर्वेक्षणाच्या आधारावर ओपिनियन पोलचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. पश्चिमकडे सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीला 25 च्या आत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी महायुतीला 21-24 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात 14-17 जागा भाजपला मिळू शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीला 48 पैकी 23-26 जागा मिळू शकतात, असे या पोलचे निष्कर्ष आहेत. यात काँग्रेसला 9-12 जागा मिळू शकतात, असा अंदाज या पोलचे आहेत.

2019 मध्ये युतीला 41 जागा

2014, 2019 या दोन लोकसभा निवडणुकीतील निकालावर नजर टाकली, तर भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळालेलं आहे. पण, यंदाच्या निवडणुकीत या पोलनुसार महायुतीला पूर्वीचे यश राखनेही अवघड होताना दिसत आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीला प्रत्येकी 41 जागा मिळाल्या होत्या. पण, यावेळी 21-24 मिळू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे असा निकाल आला, तर महायुतीसाठी हा सगळ्यात मोठा झटका असेल, तर असा निकाल आले, तर ते महाविकास आघाडीला संजीवनी देणारे ठरू शकतात. अशा प्रकारचे चित्र महाराष्ट्रातील निकालातून आले, तर विधानसभा निवडणूक महायुतीला जड जाऊ शकते.

सी व्होटरच्या पोलमध्येही महायुतीला धक्का

गेल्या महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये समोर आलेल्या एबीपी-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्येही महाराष्ट्रात काट्याची निवडणूक होईल, असा अंदाज आहे. सी व्होटरच्या पोलनुसार महायुतीला 28 जागांवर विजय मिळू शकतो, तर महाविकास आघाडी 20 जागांवर जिंकू शकते. या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला 22 जागा मिळू शकतात. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून 6 जागा मिळू शकतात.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळून 16 जागा मिळू शकतात. त्यात काँग्रेसला 4 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.