पुण्यात गणेशोत्सवाआधी FDAची गुप्त माहितीतून बुधवार पेठ परिसरात धाड ४ ट्रक पनीर-खवा जप्त; सणासुदीच्या ॲक्शनने खळबळ!

0

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळून आल्याने एफडीएच्या कारवाईने खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात मिठाई, पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच पार्श्वभूमीवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

बुधवार पेठेत एफडीएची धडक कारवाई –

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

एफडीएच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात कारवाई करत मोठ्या प्रमाणात पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला. तब्बल चार ट्रकमधून हा साठा आढळून आल्याने कारवाईचे गांभीर्य वाढले. मोठ्या प्रमाणातील साठा असल्याने कारवाईसाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हा माल परराज्यातून आला होता. या कारवाईत पुण्यातील अधिकारी नव्हते. गुप्त माहितीतून अधिकाऱ्यांची धाड पडली. या कारवाईदरम्यान संबंधित खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली.

पनीर-खव्याचे नमुने तपासणीसाठी –

जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्यामध्ये भेसळ आहे का, तसेच हा मोठ्या प्रमाणातील साठा नेमका कुठून आणण्यात आला, याबाबत एफडीएकडून तपास सुरू आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतर या खाद्यपदार्थांचा दर्जा आणि त्यामध्ये काही अनियमितता आढळते का, हे स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

गणेशोत्सवाआधी भेसळखोरांवर नजर –

गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात भेसळयुक्त खवा, पनीर आणि इतर खाद्यपदार्थ बाजारात येण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. बुधवार पेठेतील चार ट्रक पनीर-खवा जप्त करण्याच्या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळातही शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या कारवाया होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जप्त केलेल्या खाद्यपदार्थांच्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.