स्मार्ट पुणे फाउंडेशन आणि प्रभाग क्र. ११च्या वतीने एक अनोखा उपक्रम; ऐतिहासिक विक्रमाचा योगसाधनेने उत्सव!

0

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र भाई मोदीजी यांनी देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून स्मार्ट पुणे फाउंडेशन आणि प्रभाग क्र. ११ च्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. प्रभाग क्र. ११ मधील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भव्य ‘योगासन स्पर्धा’ उत्साहात पार पडली!

यशवंत चव्हाण मनपा शाळा जयभवानी नगर (दुपार विभाग) विध्यार्थी संख्या 180 तसेच (सकाळ विभाग ) विध्यार्थी संख्या 220 व मामासाहेब मोहोळ मनपा शाळा, केळेवाडी विध्यार्थी संख्या 160 असे 600 हून अधिक उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग घेतला 15 गुणवंत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

या कार्यक्रमाचे आयोजक प्रभाग 11 च्या नगरसेविका सौ. मनीषा संदीप बुटाला व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य, कोथरूड मध्य मंडलाचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी केले. या कार्यक्रमांस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता उभे व सौ.विजया वव्हाळ आणि सौ.संगीता बारावे विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमांस प्रभाग ११चे अध्यक्ष श्री. अतुल शिंदे, भाजपचे जेष्ठ नागरिक आघाडीचे मा. कमलाकरजी भोंडे, मा.बळीराम भडकवाड या कार्यकमाचे व्यवस्थापन श्री.संजय पिंगळे यांनी केले.