पुणे महापालिका मिळकतकर विभाग ‘हार्ड डिस्क’ चोरी चौकशी अहवाल सार्वजनिक करा; दिनेश भिलारे यांची मागणी

0

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाशी संबंधित हार्ड डिस्क चोरीला गेल्याची, त्यानंतर ती फॉरमॅट करून विक्री करण्यात आल्याची बाब समोर आल्याने पुणेकर नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, घटनेची वस्तुस्थिती, माहिती गळतीची शक्यता, सायबर सुरक्षा उपाययोजना, डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act 2023) अंतर्गत झालेली कार्यवाही, तसेच जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे यांनी केली आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

दिनेश भिलारे यांनी म्हटले आहे की, पुणे महापालिकेकडे लाखो नागरिकांची मालमत्ता माहिती, जन्म-मृत्यू नोंदी, कर संबंधित माहिती आणि विविध नागरी सेवांशी संबंधित वैयक्तिक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ही घटना केवळ ‘हार्ड डिस्क’ चोरीची नसून नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार, डिजिटल माहितीची सुरक्षितता आणि सार्वजनिक संस्थांवरील विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे.

या प्रकरणात Cyber Forensic Report, Data Recovery Report, Root Cause Analysis Report, Action Taken Report आणि Corrective Action Plan तातडीने सार्वजनिक करण्यात यावेत. तसेच माहिती गळती झाली आहे किंवा नाही याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

यापूर्वीही जन्म नोंदणी प्रणालीतील फेरफार आणि विविध डिजिटल प्रणालींशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या विभागांचे स्वतंत्र Cyber Security Audit, Vulnerability Assessment and Penetration Testing (VAPT), Application Security Audit आणि Database Security Audit करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

“जर अशीच घटना एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत, आयकर विभागात किंवा इतर संवेदनशील सरकारी संस्थेत घडली असती, तर त्याची दखल अत्यंत गांभीर्याने घेतली गेली असती. मग पुणेकर नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा का झाला?” असा सवालही दिनेश भिलारे यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, गोपनीयता आणि सार्वजनिक संस्थांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता ठेवून चौकशी अहवाल सार्वजनिक करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पतितपावन संघटनेने केली आहे.यावेळी संघटनेचे प्रांत सहसंघटक रवींद्र भांडवलकर, शहर पालक गिरीश काकडे, शहर अध्यक्ष तेजस पाबळे, मिलिंद तिकोने, यादव पुजारी, विनायक रणदिवे, योगेश वाडेकर उपस्थित होते.