पुणे पदवीधर भाजपची ‘वनसाईड’ निवडणुक चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्याने अडचणीत? या नेत्याने दंड थोपटले

0

सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण शांत होत असताना आता पुढील काही महिन्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला वेग येणार आहे.  विधानपरिषदेप्रमाणेच सातारा-सांगली आणि नाशिक सारखी परिस्थिती या निवडणुकीमध्ये सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीचे सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष यांच्यात आजपर्यंत अटीतटीच्या लढती झाल्या असून हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा यासाठी दोन्ही पक्षांकडून दहावी प्रति दावे केले जात आहेत. सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये ही अतितटीची जागा थेट विद्यमान आमदारांच्या पुत्रासाठी जाहीर केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मुळात भारतीय जनता पक्ष ही जागा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना कोल्हापूर विभागातून नवे बंड निर्माण झाले आहे पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित समजले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून भैय्या माने यांनी या उमेदवारीवर आपला दावा कायम ठेवला आहे. महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराची चर्चा नसल्याने ही निवडणूक भाजपसाठी वनसाईड समजली जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भैय्या माने यांनी या उमेदवारीवर आपला दावा मजबूत केला आहे. भैय्या माने हे पदवीधरच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

पुणे पदवीधर मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा आहे. अशात या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द घेऊन पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समारंभातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता दिली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी तयारी सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी पदवीधरांची नोंदणी केल्याचा दावा करत उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. येत्या तीन ते चार महिन्यात पदवीधरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यंदा या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटली आहे. अशातच भैय्या माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी मतदारांची नोंदणी केली असल्याचा दावा करत उमेदवारीसाठी आग्रह असल्याचा दावा सरकारनामाशी बोलताना केला आहे.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

उमेदवारीवरून पुन्हा संघर्षाची चिन्हे

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सर्वश्रुत आहे. मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे काही नेते यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वनवा पेटला आहे. अशातच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय झालेली मतदार नोंदणी

कोल्हापूर जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ८०,१८०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी – ८,६३१

पुणे जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ५४,८१०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी – ९,७७८

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

सांगली जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ७०,७२०

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी – ६,१३४

सातारा जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ३५,८७९

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी – ८,४९२

सोलापूर जिल्हा

पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- ३०,४७२

शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी – ११,१९८