भाजपकडे 17 पैकी 14 ठिकाणी बहुमत शिवसेना फक्तं या मतदारसंघात, तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमत; कुणाचे किती आमदार वाढणार?

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याआधी राज्यातील विधानपरिषदेचे गणित मांडणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील 17 पैकी तब्बल 14 ठिकाणी भाजपकडे एकहाती बहुमत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना एकाच मतदारसंघात, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघात बहुमताचा आकडा आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत असून पुणे व परभणी-हिंगोली मतदारसंघात राष्ट्रवादीकडे जादुई आकडा आहे.

महायुतीमधील तेढ निर्माण होण्याचे कारण- 

पुण्यात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी मोठा दिसत असला, तरी भाजप-शिवसेनेकडे पुण्यात राष्ट्रवादीहून अधिक मते आहेत. पुण्यात भाजप व शिवसेना एकत्रित, तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे पुण्यावर भाजपने दावा केला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेकडे अधिक मत असूनही हा मतदारसंघ अनिकेत तटकरेंसाठी राष्ट्रवादीकडून मागितला जात आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे परभणी-हिंगोली जागेची मागणी केली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आकडेवारी पाहिली असता राष्ट्रवादीच्या वाट्याला एक, शिवसेनेच्या वाट्याला एक व 15 जागा हा भाजपच्या वाटेला येणे अपेक्षित आहे. मात्र राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला व शिवसेनेसोबत युतीत लढल्यामुळे भाजपने शिवसेनेला एका ऐवजी 4 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यात कुठल्या मतदारसंघात कुणाची किती ताकद?-

ठाणे- एकूण मते – ९९७

भाजप – ४३१

शिवसेना – ३०९

राष्ट्रवादी – १८

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग- एकूण मते – ८२३

भाजप – २४१

शिवसेना – २७५

राष्ट्रवादी – १४९

अहिल्यानगर – एकूण मते – ४५२

भाजप – २०७

शिवसेना – ४४

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

राष्ट्रवादी – ६४

जळगाव – एकूण मते – ६६७

भाजप – २७४

शिवसेना – २०८

राष्ट्रवादी – ५५

नाशिक – एकूण मते – ६०३

भाजप – १८६

शिवसेना – १६१

राष्ट्रवादी – १०७

सोलापूर – एकूण मते – ६१७

भाजप – ३०४

शिवसेना – ७६

राष्ट्रवादी – ४८

सांगली सातारा- एकूण मते – ८९८

भाजप – ३७१

शिवसेना – ११०

राष्ट्रवादी – १४५

पुणे – एकूण मते – ८७८

भाजप – ३३५

शिवसेना – ८२

राष्ट्रवादी – ३७५

यवतमाळ -एकूण मते – ४४६

भाजप – १३५

शिवसेना – १०४

राष्ट्रवादी – २९

भंडारा गोंदिया – एकूण मते – ४३६

भाजप – १९६

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

शिवसेना – १५

राष्ट्रवादी – ८३

वर्धा चंद्रपूर गोंदिया- एकूण मते – २६४

भाजप – १४९

शिवसेना – १

राष्ट्रवादी – १५

अमरावती – एकूण मते – ४४९

भाजप – १३६

शिवसेना – २३

राष्ट्रवादी – ८३

धाराशिव लातूर बीड- एकूण मते – ९०४

भाजप – ३७९

शिवसेना – ८०

राष्ट्रवादी – २०२

परभणी हिंगोली – एकूण मते – ४७३

भाजप – १११

शिवसेना – ७४

राष्ट्रवादी – १२३

छत्रपती संभाजी नगर – जालना- एकूण मते – ६४६

भाजप – २५४

शिवसेना – १३९

राष्ट्रवादी – ८६

नागपूर -एकूण मते – ७९४

भाजप – ५०१

शिवसेना – ३०

राष्ट्रवादी – ५