मुंढर गावी गिमवी विभागाच्या वतीने भीम महोत्सव १३५ वा मोठ्या उत्साहात संपन्न

0

गुहागर: दि. १६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ आणि शाखा क्र. २४ मौजे गाव मुंढर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव आणि तथागत गौतम बुद्ध यांचा २५७० वा जयंती महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम जैतवन बुद्धविहार मुंढर येथे विभागीय अध्यक्ष राजेश रामचंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात आणि हर्षोल्लासात संपन्न झाला, सदर प्रसंगी भीम स्तंभाला पुष्पसुमन अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून धम्मध्वजाचे आणि निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण मुंबई विभागाचे अध्यक्ष शशिकांत सुर्वे आणि विनोद मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जैतवन बुद्धविहारास भूदान दिलेल्या दानविरांच्या नामफलकाचे उद्घाटन जमिनीचे मालक जनार्दन गमरे, प्रदीप गमरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तद्नंतर धार्मिक पूजापठण आदर्श बौद्धाचार्य चंद्रकांत गमरे गुरुजी यांनी आपल्या सुमधुर आवाजात संपन्न केला. पहिल्या सत्रात सौ. सानिका सचिन गमरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळ खेळूया पैठणीचा सन्मान राखू वहिणींचा हा खेळ खेळण्यात आला सदर खेळाचे अँकर विशाल रामदास गमरे आणि राजेश मोहिते यांनी केलेल्या अफलातून अँकरिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले व सर्वांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला, सदर खेळात जवळपास पंचाहत्तर महिलांनी सहभाग घेतला होता त्यात नीता विशाल जाधव यांनी प्रथम, सानिका राजेश मोहिते यांनी द्वितीय, दीक्षिता सागर सुर्वे यांनी तृतीय व माधुरी मनोहर गमरे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

मोफत आरोग्य शिबिर भूषण पवार, सागर सुर्वे आणि सुशील पवार यांच्या पुढाकाराने प्रोलाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी या हॉस्पिटलचे मालक डॉ. सचिन बालकृष्ण ओक आणि डॉ. अश्विनी सचिन ओक आणि त्यांचे सहकारी डॉ. रोशन माटल, नर्स गायत्री हेदवकर, नुपूर दीक्षित, जयशा पावसकर, सोहम जामशेतकर आणि चष्मा प्रमुख नितीन कातकर, मॅनेजर दीपक मोरे यांच्या टीमच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते व जवळपास शंभराच्या वर गरजूंनी सदर शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चलचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचे काम सुप्रसिद्ध आर्टिस्ट राहुल कांबळे यांनी केले तर सुप्रसिद्ध आर्टिस्ट संदीप पवार यांच्या संकल्पनेतून संविधान जनजागृती देखाव्याची निर्मिती करण्यात आली सदर देखावा आणि चलचित्र रांगोळी हे आकर्षणाचे केंद्र राहिले.

दुसऱ्या सत्रात भव्यदिव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली चा समारोप झाल्यावर तिथेच त्याचे सभेत रूपांतर झाले, सदर रॅली चे सभेत रूपांतर होण्याआधी शाखा क्र. २४ अंतर्गत अनिल जाधवांच्या अध्यक्षतेखाली लकी ड्रॉचे पारदर्शक पद्धतीने बक्षीस वितरण करण्यात आले. सदर सभेला तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, चेअरमन मारुती मोहिते, सचिव दिलीप मोहिते, महिला विभागाच्या विनिता सुर्वे, विभा गमरे, दीपाली गमरे या महिला उपस्थित होत्या आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी सदस्य प्रमोद शेठ गांधी, गुहागर गटविकास अधिकारी परेश शिरसाठ, तंटामुक्ति समिती मुंढरचे प्रकाश शिर्के, गुहागर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रभाकर शिर्के, मुंढर गाव विद्यमान सरपंच अमिषा गमरे, मुंढर गावचे माजी सरपंच प्रभाकर शिर्के, माजी सदस्य आर. के. मोहिते, बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त रामदास धो. गमरे, जिल्हा परिषद शाळा मुंढरचे मुख्याध्यापक दशरथ कदम, मुंढर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत साठे, ग्रामविकास अधिकारी मुंढर सुरेश गोरे, माजी चेअरमन रविंद्र मोहिते, माजी चिटणीस महेंद्र मोहिते आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आपले विचार मांडीत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

पदवीधर, पदविकाधार, उच्च पदवीधर अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जाधव आणि निलेश गमरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले. तर पाहुण्यांचे स्वागत गाव शाखा अध्यक्ष दर्शन गमरे आणि मुंबई शाखा अध्यक्ष विनोद मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना शाल, पुष्प, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माहेरवाशिणीना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, त्यासोबत विभाग अधिकारी, शाखा अधिकारी, पाहुणे, स्थानिक मंडळी अशा जवळपास साडे तीनशे मान्यवरांना शाखेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

असा हा आगळावेगळा कार्यक्रम शाखेच्या वतीने करण्यात आल्याबद्दल प्रत्येक वक्त्याने शाखेच भरभरून कौतुक केलं. रात्री दहा नंतर अरविंद मोहिते व अर्चना मोहिते निर्मित प्रस्तुत बहुजनांची प्रेरणा धम्मपद हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला, सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई आदींच्या कार्याची, विचारांची ऐतिहासिक माहिती दिली, अँकर अर्चना मोहिते यांनी अत्यंत प्रभावी अस अँकरिंग केले, अर्चना मोहिते या महाड क्रांतीभूमीतील ९६ कुळी मराठा घराण्यातील सुकन्या असून ती बाबासाहेबांची लेक झाल्यानंतर तिच्यात जे परिवर्तन घडले ते तिने अत्यंत प्रभावीपणे मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

धम्मपद ऑर्केस्ट्राच्या सर्व कलाकारांनी कार्यक्रमात असा काही रंग भरला की पहाटे चार वाजेपर्यंत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाखा क्र. २४ मौजे मुंढर गाव आणि मुंबई शाखेच्या सर्व पदाधिकारी, सभासद तरुण मंडळी, महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन तालुक्यात एक नंबर असा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानून अध्यक्ष राजेश रामचंद्र मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.