पुणे महापालिका प्रशासनाचा पालखी सोहळ्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार! वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मोठे पाऊल

0

पुणे महानगरपालिका भवनात मंगळवारी पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेसा आणि शिस्तबद्ध सोहळा घडवण्यासाठी पालखी मार्गावरील स्वच्छता,

पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. वारकर्‍यांसाठी निवास व विश्रांती व्यवस्था सक्षम करण्यासोबतच आपत्कालीन सेवांची तयारी आणि सर्व विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, प्रजित नायर, सहाय्यक आयुक्त रंजन कुमार, पोलिस उपायुक्त हिंमत जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखने, पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. राजेंद्र उमाप, संत तुकाराम महाराज संबंधित देहू संस्थानचे हभप उमेश मोरे, दिंडी संघटनांचे प्रतिनिधी भाऊ महाराज फुरसुंगीकर, सोहळामालक राजेंद्र आरफडकर, विश्वस्त रोहिणी पवार, राजाभाऊ भुजबळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन आणि वारकरी प्रतिनिधींमध्ये समन्वय राखत नियोजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यावर बैठकीत एकमत झाले.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज