जनगणनेतील घर यादीत काय आहेत ३४ प्रश्न; ‘या’ वेबसाईटवर जाऊन करता येणार जनगणना

0

घरी रोज कोणते धान्य खाता यापासून तुमचे घर कशाचे आहे, इथंपर्यंतचे प्रश्‍न आता नागरिकांना विचारले जाणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणनेत ३४ प्रश्‍न विचारले जाणार आहेत. १६ मे ते १४ जूनदरम्यान ही गणना होणार आहे. तत्पूर्वी एक ते १५ मे दरम्यान नागरिक स्वतः जनगणनेच्या वेबपोर्टलवर माहिती अपलोड करू शकतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१६ मे ते १४ जून दरम्यान घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वेबपोर्टलवरील आयडी द्यावा लागणार आहे. https://se.census.gov.in या वेब पोर्टलवर स्वतः नागरिकांना माहिती भरता येईल.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

असे आहेत प्रश्‍न…

पहिले ३ प्रश्‍न प्रगणकाद्वारे भरले जातील.

४. जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

५ भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

६ छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

७ घराच्या वापरासंबंधी खात्री करा

८ गणना घराची स्थिती

९ कुटुंब क्रमांक

१० व्यक्तींची एकूण संख्या

११ कुटुंब प्रमुखाचे नाव

१२ लिंग: १- पुरुष, २- स्त्री, ३- तृतीयपंथी

१३ अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर: १- अनुसूचित जाती (एससी), २- अनुसूचित जमाती (एसटी), ३- इतर.

१४ घराच्या मालकी हक्काची स्थिती:

१५ निवासयोग्य खोल्यांची संख्या

१६ विवाहित जोडप्यांची संख्या

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

१७ पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत

१८. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता

१९. प्रकाशाचा मुख्य स्त्रोत

२०. शौचालयाची उपलब्धता

२१. शौचालयाचा प्रकार

२२. सांडपाणी व्यवस्था

२३. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता

२४. स्वयंपाक घराची उपलब्धता आणि एलपीजी / पीएनजी जोडणी

२५. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंध

२६. रेडिओ / ट्रान्झिस्टर

२७. दूरचित्रवाणी (टीव्ही)

२८.

२९. संगणक / लॅपटॉप

३०. दूरध्वनी / मोबाइल फोन / स्मार्ट फोन

३१. सायकल आणि स्कूटर / मोटारसायकल / मोपेड

३२. कार / जीप / व्हॅन: १- होय, २- नाही.

३३. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य

३४. मोबाईल क्रमांक: (पोर्टलवर केलेल्या नोंदणी तपशीलातून आपोआप प्राप्त होईल).

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश