पुणे महापालिकेचे सभागृह उच्चशिक्षित; साक्षर नगरसेवक उरले फक्त ४५!; चर्चा आणि निर्णयांचा स्तर उंचावणार

0

पुणे महापालिकेमध्ये कालच महापौर आणि उपमहापौर यांचे उमेदवारी अर्ज समाविष्ट करण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे स्मार्ट सिटीला योग्य न्याय देण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या वतीने उच्चशिक्षित आणि विचाराने प्रगल्भ असलेल्या नेतृत्वांना संधी दिल्याने विद्येचे माहेरघर आता ‘स्मार्ट सिटी’ या नावालाही न्याय देण्यास सक्षम झाले आहे. पुणे महापालिकेच्या १६५ नगरसेवकांमध्ये ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाकावरील उमेदवार हे उच्चशिक्षित असल्याने सभागृहातील चर्चेचा स्तर आणि संदर्भाची पातळी उच्च राहणार असल्याने पुणे शहराच्या दृष्टीने चांगले निर्णय होण्याच्या अपेक्षा नागरिकांना वाढले आहेत. तर दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ असून (इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण) घेतलेल्यांचा समावेश आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या ३३ आहेत. केवळ १४ नगरसेवकांचे शिक्षण ‘पदव्युत्तर पदवी’पर्यंत झाले आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

पुणे महापालिकेची निवडणूक झाली. त्यात ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून आले. त्यात भाजपच्या ११९ , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) २७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ३ , काँग्रेसचे १५ आणि उद्धवसेना पक्षाचा १ उमेदवार निवडून आलेला आहे. पुणे शहराचा कारभार हे नगरसेवक हाकणार आहेत. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. या १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, २५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

पदविका मिळविलेले सदस्य : ५

पदव्युत्तर शिक्षण : १४

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले : ३३

दहावीपर्यंत शिकलेले नगरसेवक : ४५

पदवी घेतलेले सभासद : ६१

शिक्षणाची माहिती उपलब्ध नसलेले नगरसेवक : ७