पुणे महापालिका ‘महापौर’ 27 तारखेकडे सर्वांचे लक्ष; केंद्रीय राज्यमंत्री यांची नामी क्लुप्ती हा कार्यक्रम जाहीर केला….

0

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली अपेक्षेप्रमाणे कायम जनसेवेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकांमध्येही विक्रमी यश मिळाले. महाराष्ट्रातील संपूर्ण महापालिकांमध्ये सध्या महापौर पदासाठी सर्व इच्छुकांची बांधणी सुरू असून पुणे महापालिकेचे सर्वसाधारण महिला हे महापौर आरक्षित झाल्याने अनेकांच्या इच्छा बळवल्या आहेत. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सर्व गोष्टींना बाजूला सार्थ जनसेवा प्रथम या भूमिकेतून उद्या कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता दरबाराचे आयोजन करत नामी क्लुप्ती काढली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी सर्वच इच्छुकांची असलेले सख्य आणि सर्वांनाच मिळणारी सौहार्दपूर्ण वागणूक यामुळे पुणे महापौर पदाची निवड राज्यस्तरावर पाठवून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जनसेवेला प्राधान्य दिले आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

पुणे शहरात सर्वच इच्छुक नगरसेवकांची मोर्चे बांधणी सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जनसंपर्क अभियान घोषित केल्याने सध्या नव्या चर्चेला उधान आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसारच अंतिम निर्णय होणार असल्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व घडामोडींमध्ये गुंतण्यापेक्षा पुणेकरांची सेवा करण्यास प्राधान्य दिल्याने एक नवा संदेश कार्यकर्त्यांसाठी पाठवला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) मधील संपूर्ण प्रक्रिया करण्याचे कार्यालयीन आदेश प्राप्त झाले आहेत. आरक्षण जाहिर झाल्यानंतर नगर सचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुक घेण्याकरीता निर्वाचित सदस्यांची प्रथम बैठक बोलावण्यासाठी तारीख व वेळ निश्चितीसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडे कार्यवाही सुद्धा सुरू झाले आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत महापालिकेच्या प्रथम सभेची तारीख व पिठासिन अधिकारी निश्चित करून व सभेची सुचना उद्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची मुदत आहे. त्यानंतर मंगळवारी महापौर/उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नाम निर्देशपत्र महापालिका सचिवांना सादर करण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार दिनांक ३०.०१.२०२६ व ३१.०१.२०२६ शनिवार पर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार आहेत.