प्रभाग 10; भाजपाची विक्रमी विजयाची वाटचाल सुरूच; विजय संकल्प रॅलीत वरिष्ठ नेते उपस्थित उत्साही स्वागत

0

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विक्रमी विजयाचे नियोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व नाराजी दूर सारत स्थानिक नगरसेवकांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेला केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. ना. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ, राज्यसभा खासदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी तसेच खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भीमरावअण्णा तापकीर आदी मान्यवर उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अ गट – किरण दगडे पाटील, ब गट- पवार रुपाली सचिन, क गट – वरपे अल्पना गणेश, ड गट वेडेपाटील दिलीप तुकाराम यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद भेटी व पदयात्रेला नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता प्रभाग 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक या प्रभागामध्ये कायम सक्रिय आणि विना खंड जनसंपर्क राखत असल्यामुळे या प्रचाराच्या धामधुमीतही नागरिकांकडून उत्साही स्वागत केले जात होते. भुसारी कॉलनी शास्त्रीनगर परिसरातील सृष्टी सोसायटी, अखिल सागर कॉलनी, मित्र मंडळ, हमराज मित्र मंडळ, गादिया इस्टेट, भीमाले टॉवर्स, कैलास मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, श्रीकृष्णा कॉलनी आणि नवभूमी मित्र मंडळ येथील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत चारही उमेदवारी यांचे मनोभावे स्वागत करून विजयी भव चा आशीर्वाद दिला आहे. निवडणूक असो किंवा नसो जनसंपर्क आणि सर्वसामान्य नागरिकांची नाळ कार्यकर्ता नगरसेवक आणि केंद्रीय नेतृत्व तिहेरी पद्धतीने अबाधित असल्याने या भागातील नागरिकांकडून भारतीय जनता पक्षाला पहिली पसंती दिली जाईल असा विश्वास पदयात्रेत सहभागी झालेल्या मान्यवर नेत्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कायमच कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले जाते. ….जनसेवा वाड्यावर नाही तर गड्यावर केली जाते ही भावना भारतीय जनता पक्षात जोपासली जात असल्याने या पदयात्रेला केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. ना. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी प्रभागातील नागरिकांना जीवाभावाच्या नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती केली. तर राज्यसभा खासदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी तसेच खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भीमरावअण्णा तापकीर यांनी विकासाचे काम आणि जिव्हाळ्याचं नातं अबाधित ठेवण्यासाठी प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “कमळ” या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या