संकल्प संस्था आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. १७ (अधिराज्य) सामाजिक क्षेत्रात कायमस्वरूपी नवनवीन उपक्रम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्त्यांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या संकल्प संस्थेच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या पाचव्या बॅचचा उद्घाटन समारंभ रविवारी दि. नोव्हेंबर २०२५ रोजी पंत वालावलकर स्कूल, नेहरू नगर, कुर्ला (पू.) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अक्षयशक्ती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नारायण अय्यर व मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या शुभहस्ते संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेह कासारे यांनी पहाडी व भारदस्त आवाजात सादर केले तर सविता हेंडवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. पाहुण्यांचा परिचय वनिता सावंत यांनी करून दिला तसेच दीपा गमरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. स्वाती पाटील आणि वनिता सावंत यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला मंत्रमुग्ध करणारी सुरेल अशी सुरुवात मिळाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

प्रमुख पाहुणे डॉ. अय्यर आणि सुरज भोईर यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी अधोरेखित करत समाजविकासासाठी संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम कार्यकर्त्यांची निर्मिती व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

सदर उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यात अथक परिश्रम घेणाऱ्या स्वाती पाटील, सोनाली कांबळे, अविनाश पाटील आणि सूर्यकांत चव्हाण यांचे तसेच प्रशिक्षणार्थी व उपस्थितांचे आभार मानून सुवर्णा बामणे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.