कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने वॉकेथॉन व स्वच्छता अभियान!

0

“स्वच्छता ही सेवा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पंधरवाडा स्वच्छोत्सव” या कार्यक्रम अंतर्गत प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तीनही प्रभागात रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी नागरिकां समवेत वॉकेथॉन व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सदर अभियानात शासकीय इमारती, पी.एम.पी.एम.एल. बसस्थानके, पौड कोथरूड डेपो, कै. धोडींबा सुतार बसस्थानक, बावधन व उत्तम नगर बस स्थानक, यशवंतराव चव्हाण नाटगृह, म. न.पा. दवाखाने इत्यादी विविध शासकीय इमारतीचे ठिकाणं “स्वच्छता ही सेवा व स्वच्छोत्सव पंधरवाडा” निमित्ताने तेथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांच्या व मा. लोक प्रतिनिधी यांच्या सहभागातून कोथरूड उपनगरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

सदर अभियान उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील, नगरसेविका हर्षाली ताई माथवड, वासंती ताई जाधव, स्विकृत नगरसेवक बाळासाहेब टेमकर, अमित तोरडमल, श्वेता तोरडमल गणेश वरपे, जनसेवक नवनाथ जाधव, दिनेश माथवड,बाळासाहेब दांडेकर, राजभाऊ गायकवाड, बाळू राठोड व तीनही प्रभागात तीन हजार नागरिकांच्या उपस्थिती मध्ये कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे ब्रँड अँबेसिडर व मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी स्वच्छेतेची शपथ दिली.

स्वच्छता ही सेवा व स्वच्छता पंधरवाडा हे सदर अभियान घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अरविंद माळी, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मागदर्शनाखाली, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, जया सांगडे, राजेश आहेर, गणेश चोंधे, दत्ता दळवी, हनुमंत चाकणकर, गणेश साठे, प्रमोद चव्हाण मोकादम वैजीनाथ गायकवाड, कुणाल जाधव, प्रविण कांबळे, आण्णा ढावरे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, लक्ष्मण सोनवणे, गजानन कांबळे, सुरेश शिंदे यांनी आप आपल्या लोकप्रतिधी व नागरिकांना अभियानात सहभागी करून घेतले. मा. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छोत्सव निमित्ताने स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ हे यशस्वी करण्यासाठी व पुणे शहराला स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत एक नंबर आणण्यासाठी विविध ठिकाणी स्वच्छतेची शपथ देऊन संदेश देण्यात आला. सदर अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवा, शाळा व महाविद्यालये येथील बाल व तरूण विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. स्वच्छता अभियान हे लोकाभिमुख व्हावे यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव