शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार चौकशीदरम्यान मोठी घटना उपकार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या; अशा एक्झिटमुळे अनेक प्रश्न उभे

0

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन त्यांनी आयुष्याची अखेर केली. शेटेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे जवळचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सोनई येथे शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान विविध वादामुळे चर्चेत आहे. धर्मादाय आयुक्तांकडेही या प्रकरणी सुनावणीही सुरु आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

काय आहे प्रकरण?

शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन शेटे हे माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शनी शिंगणापूर देवस्थानमधील सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक तपास सुरू आहे. शेटे यांच्या पार्थिवावर सोनई येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीन शेटे यांच्या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे चर्चांना आले उधाण आलं आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

सार्वजनिक जीवनातील एक जबाबदार अधिकारी असलेल्या नितीन शेटे यांची अशा प्रकारे एक्झिट घेणं अनेक प्रश्न उभे करत आहे. देवस्थानमधील राजकीय हस्तक्षेप, आर्थिक घोटाळे आणि अंतर्गत कलह या सर्व गोष्टींचा तपास लावणं आता अत्यावश्यक बनलं आहे. ही केवळ आत्महत्या की दबावामुळे उचललेलं टोकाचं पाऊल? असा प्रश्न विचारला जात असून प्रशासनासह संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.