जनसेवी शिंदे(मामां)च घरोघरी प्रचारालाच प्राधान्य; पिंड समाजसेवेचा ध्येय जनसेवेच! मतदारांची पसंती वाढतेय

0

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून फक्त आणि फक्त राजकीय पक्षांचे प्रचार आणि त्यांच्या प्रचारगीतांचे ध्वनी यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत असली तरी सुद्धा ...ज्यांचा पिंड समाजसेवा आणि ध्यास जनहित! असते असे कार्यकर्ते न पक्षाचा विचार करतात ना चिन्हाचा त्यांचे उद्दिष्ट म्हणजे जनसेवा आणि त्यासाठी मिळालेली संधी सत्कारणी लावण्याचे हेतूने असे ध्येयवेढे समाजसेवी कार्यकर्ते सुद्धा नागरिकांसाठी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रणांगणात उभे असतात. कोथरूडच्या उर्वरित भागाचा पुणे महापालिकेमध्ये समावेश झाल्यापासून कोथरूड भुसारी कॉलनी बावधन परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येसाठी झटणारे एक नाव म्हणजे चंद्रकांत शिंदे (मामा)! प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करावी चहापाणी विचारावा समस्या विचारावे या उदाते हेतूनेच या शिंदे मामा यांनी या परिसरात आपली आगळी वेगळी नाळ निर्माण केली आहे.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

मी पुणे महानगरपालिका निवडणूक 2025-26 मध्ये प्रभाग क्र. 10 (ड) सर्वसाधारण पुरुष या गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत शिंदे मामा पतंग चिन्हावर जनमताचा कौल घेण्यासाठी घरोघरी जात आहेत. प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व विकासासाठी सातत्याने 32 वर्ष कार्यरत असल्याने मतदारांचा कौल पिंडाच्या समाजसेवी कार्यकर्त्याला मिळेल असा विश्वास चंद्रकांत शिंदे मामांना वाटत आहे. प्रभागामध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, खेळाडूंकरिता मोफत प्रशिक्षण केंद्र, भुसारी कॉलनीतील पाणी प्रश्नासाठी आंदोलन, तसेच रस्ते, स्ट्रीट लाईट व ओपन स्पेस जागांसाठी अनेक वेळा आंदोलन असे समाज उपयोगी कार्यक्रम केल्यामुळे मतदारांच्या मनामध्ये शिंदे मामा यांच्याविषयी आस्था आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाची ओसरी न धरता भुसारी कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी कोविडच्या संघर्षमय काळात स्वतः रस्त्यावर उतरून गरजूंना अन्नधान्य पुरवठा, लसीकरण करून देणे, सॅनिटायजेशन करणे, रुग्णालय उपलब्ध करुन देणे, जनजागरण करणे अशी विविध कामे सामाजिक कर्तव्य म्हणून चंद्रकांत शिंदे मामा यांनी केली आहेत. परिसरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निगडी चा प्रश्न म्हणजे भुसारी कॉलनीतील ओपन स्पेस जागा बिल्डरच्या ताब्यात देण्यात आली होती. ही जागा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी क्रीडांगण, मंदिर, जिम इत्यादींसाठी राखीव होती. ती पुन्हा आपल्या हक्काची जागा नागरिकांना मिळावी यासाठी चंद्रकांत शिंदे मामा यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत अमूल्य मत देऊन विजयी करण्याची नम्र विनंती व्यक्तिगत गाठीभेटी आणि संवाद बैठकांमधून करण्यात येत आहे. याबरोबरच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे वचन मतदारांना दिलासादायक वाटत असून पतंग या चिन्हास मतदारांची पसंती वाढत आहे.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

पुढील विकासकामांसाठी माझी ठाम भूमिका –

  • 1. ओपन स्पेस जागा परत मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न
  • 2. 480 चौरस फूट घरांसाठी मुबई प्रमाणे टॅक्स माफ करणे
  • 3. प्रभागाअंतर्गत रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सार्वजनिक सुरक्षेत वाढ करणे
  • 4. 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यासाठी प्रयत्न
  • 5. आरोग्यासाठी मोफत व सुसज्ज रुग्णालय उभारण्याकरिता प्रयत्न
  • 6. 24×7 सेवेसाठी अॅम्ब्युलन्स सुविधा
  • 7. नागरिकांच्या इतर मूलभूत गरजा सोडविण्यासाठी सतत प्रयत्न
  • 8. मोफत वाचनालयाची सुविधा
  • 9. संपूर्ण प्रभागात मोफत Wi-Fi सुविधा उपलब्ध करून देणे
  • 10.1 डावी भुसारी कॉलणी मधे गार्डन जॉगिंग ट्रैक व खेळाचे मैदान करणे
अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

कोथरूड बावधन प्रभाग 10 साठी जनसेवी चंद्रकांत शिंदे मामा यांनी वरील 10 विकास कामांचे वचन नागरिकांना दिले आहे.